ठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पुलावर क्रेन उलटली, तासभर वाहतुकीचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 00:43 IST2026-04-09T00:41:48+5:302026-04-09T00:43:27+5:30

ठाणे, घोडबंदर रोड, नाशिक आणि समृद्धी महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबईच्या दिशेने वाहनांची वर्दळ असते.

Crane overturns on Kopri bridge on Eastern Expressway in Thane, traffic disrupted for an hour | ठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पुलावर क्रेन उलटली, तासभर वाहतुकीचा खोळंबा

ठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पुलावर क्रेन उलटली, तासभर वाहतुकीचा खोळंबा

ठाणे ते मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावर कोपरी पुलावर क्रेन उलटल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४ वाजता घडली. या घटनेमुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला सुमारे तासभर खोळंबा झाला होता. ठाण्याहून मुंबईकडे रस्ते मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागला.

ठाणे, घोडबंदर रोड, नाशिक आणि समृद्धी महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबईच्या दिशेने वाहनांची वर्दळ असते. या मार्गावरील आनंदनगर साकेत उन्नत मार्गिकेच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामासाठी कोपरी रेल्वे पुलावर खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री चालकांना कोंडीचा सामना करावा लागतो.

बुधवारी (८ एप्रिल) सायंकाळी ४ वाजता ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उभी असलेली महाकाय क्रेन अचानक उलटली. क्रेनचा भाग रस्त्याच्या दिशेने झुकल्याने वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली.

घटनेची माहिती ठाणे शहर वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर कोपरी आणि नौपाडा वाहतूक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी क्रेन सुरळीत करण्याबरोबरच वाहतूक नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले. ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.

कोंडीमुळे कोपरी पूल ते कॅडबरी जंक्शनपर्यंत वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. मुंबई ते ठाणे मार्गावरही कोंडी झाली होती. सायंकाळी साधारण ५ ते ५:३० नंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आल्याची माहिती नौपाडा वाहतूक विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त अंजली भोईर यांनी दिली.

Web Title : ठाणे के कोपरी पुल पर क्रेन पलटी, यातायात बाधित

Web Summary : ठाणे में कोपरी पुल पर एक क्रेन पलट गई, जिससे मुंबई की ओर पूर्वी एक्सप्रेसवे पर एक घंटे तक यातायात बाधित रहा। निर्माणाधीन क्षेत्र के पास हुई इस घटना से भारी भीड़भाड़ हो गई। पुलिस ने यातायात को परिवर्तित किया, जिससे शाम तक स्थिति सामान्य हो गई।

Web Title : Crane Overturns on Kopri Bridge, Thane; Traffic Disrupted

Web Summary : A crane overturned on the Kopri bridge in Thane, disrupting traffic on the Eastern Express Highway towards Mumbai for an hour. The incident, occurring near ongoing construction, caused significant congestion. Police rerouted traffic, gradually restoring normalcy by evening.