एसीपी निपुंगेेंचाअंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, अटक टाळण्यासाठी आटापिटा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 22:58 IST2017-09-14T22:58:39+5:302017-09-14T22:58:42+5:30
एकीकडे मुख्यालय प्रमुखांनी सहाय्यक पोलीस आयुक्त एस. बी. निपुंगे यांना हजर होण्यासाठी नोटिस बजावली असतांनाच ठाणे न्यायालयानेही त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन गुरुवारी फेटाळला.

एसीपी निपुंगेेंचाअंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, अटक टाळण्यासाठी आटापिटा सुरू
ठाणे, दि. 14 - एकीकडे मुख्यालय प्रमुखांनी सहाय्यक पोलीस आयुक्त एस. बी. निपुंगे यांना हजर होण्यासाठी नोटिस बजावली असतांनाच ठाणे न्यायालयानेही त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन गुरुवारी फेटाळला. त्यामुळे अटक टाळण्यासाठी आटापिटा करूनही ब्रेक लागल्यामुळे निपुंगेंच्या वकिलाला रिकाम्या हाताने परतावे लागले.
मुख्यालयातील महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीपी निपुंगे हे ६ सप्टेंबरपासून फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी पुणे आणि नाशिक येथे पोलिसांची दोन पथकेही गेली होती. त्यानंतरही ते हाती न लागल्यामुळे मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे त्यांच्याविरुद्ध हजर होण्याची नोटिस बजावली आहे. दरम्यान, गुरुवारी अचानक निपुुंगे यांनी त्यांच्या वकिलामार्फत कळवा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळावा, अशी मागणी केली. आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, या प्रकरणात त्यांचे एफआयआरमध्ये थेट नाव आहे. शिवाय, त्यांनी सुभद्रा हिला वारंवार फोन करून मानसिक छळ केल्याचा त्यांच्यावर आरोप असल्याचे सांगून अतिरिक्त सरकारी वकील विनीत कुलकर्णी यांनी त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन देण्याला जोरदार आक्षेप घेतला. या प्रकरणी तपास अधिकाºयांचे म्हणणे घेण्यात येणार आहे. त्यामुळे आरोपी असलेल्या एसीपी निपुंगेंचा अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळण्यात येत असल्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. बावनकर यांनी घोषित केले. या सुनावणीला निपुंगे हे मात्र हजर नव्हते.