शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कोरोना काऊन्सिलींग माध्यमातून ५०० हून अधिक ठाणेकरांचे केले समुपदेशन, ‘वुई आर फॉर यु’ या अभियानाअंतर्गत सेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 6:17 PM

ठाण्यातील किरण नाकती यांनी ठाणेकरांचे कोरोना काऊन्सलींग केले आहे.

ठळक मुद्देकिरण नाकती यांनी सुरू केली कोरोना काऊन्सलींग सेवा५०० हून अधिक कोरोना बाधित आणि नातेवाईकांचे समुपदेशन ‘वुई आर फॉर यु’ या अभियानाअंतर्गत ‘कोरोना काऊंन्सिलिंग’ सुरू

ठाणे : केवळ शारिरीक कोरोनाने नव्हे तर मानसीक कोरोनाने ग्रासलेल्या ठाणेकरांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी आदित्य प्रतिष्ठान, ठाणे आयोजित ‘वुई आर फॉर यु’ या अभियानाअंतर्गत ‘कोरोना काऊंन्सिलिंग’ या सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत ५०० हून अधिक कोरोनाबाधित आणि त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशन करण्यात आले. या समुपदेशनातून सुसंवादाने कोरोनावर मात करण्याचे बळ मिळाले असल्याच्या भावना ठाणेकरांनी व्यक्त केल्या.         सुसंवाद नेहमीच बदल घडवत असतो. आजही संवाद खुंटत असलेल्या कोरोनाच्या या काळात एकमेकांसोबत सुसंवाद अतिशय महत्वाचा आहे. आत्मविश्वास वाढविणारा आहे. हे लक्षात घेऊन आदित्य प्रतिष्ठान, ठाणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती यांनी ‘कोरोना काऊंन्सिलिंग’ ही सेवा सुरू केली. २४ तास सुरू असलेल्या या सेवेमुळे कोरोनाग्रस्त आणि त्यांच्या नातेवाईकांचा आत्मविश्वास वाढला. तसेच, मानसिकरित्या कोरोनावर मात करण्यासाठी याचा अनेकांना फायदा झाला. ही सेवा जास्तीत जास्त लोकांना देण्याचा मानस आहे असे नाकती यांनी लोकमतला सांगितले. शारिरीक कोरोनाचे औषधरूपी उपचार रुग्णालयात सुरू असताना दुसरीकडे मानसिक कोरोना घालवण्यासाठी ‘वुई आर फॉर यु ची’ कोरोना काऊंन्सिलिंग ही सेवा वरदान ठरत आहे अशा भावना या सेवेचा लाभ घेतलेल्या ठाणेकरांनी व्यक्त केल्या.कोरोनाची मनात भिती असल्याने कोरोना हा मानसीक आजार झाला आहे. घरातील एखाद्या कुटुंबातील सदस्य कोरोनाग्रस्त आढळल्यास त्याचे संपूर्ण कुटुंब मानसीक ताणतणावाखाली जाते. हे सर्व पाहिल्यावर नाकती यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कधी घरी जाऊन तर कधी रुग्णालयात जाऊन तर कधी फोनद्वारे समुपदेशन करीत आहेत. ‘वुई आर फॉर यु ला साथ देऊ या, कोरोनावर मात करू या’ असे आवाहन त्यांनी ठाणेकरांना केले आहे.-------------------------------------------------------------------------------------------------------कोरोना काळात आमचे सख्खे शेजारी ही आमच्या सोबत परकेपणाने वागत असताना माझ्याशी दूर दूर ही ओळख नसलेले नाकती सर अगदी आपलेसे वाटले. कोरोना कौन्सिलिंगच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या या अप्रत्यक्ष मदतीला कायम स्मरणात ठेवेन.- माधुरी जाधव,  ठाणे

टॅग्स :thaneठाणेCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याsocial workerसमाजसेवक