शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

एमएमआरडीएच्या रेंटलच्या घरात भ्रष्टाचार, ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आक्रमक, चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 16:51 IST

Thane Municipal Corporation: दिवा येथील एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील योजनेतील सदनिकांच्या वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. खोटे दस्तऐवज, ताबा पावती, बायोमेट्रीक सव्र्हे याआधारे हा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ठाणे - दिवा येथील एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील योजनेतील सदनिकांच्या वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. खोटे दस्तऐवज, ताबा पावती, बायोमेट्रीक सव्र्हे याआधारे हा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात पालिका अधिका-यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत त्याचा छडा लावण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून संबंधितांवर कारवाई करण्याचा आग्रह राष्ट्रवादीने धरला आहे. दुसरीकडे याच प्रकरणावरुन कॉंग्रेसने थेट न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे. त्यातही या हे प्रकरण दाबण्यासाठी कोकणातील दोन मंत्र्यांचा दबाव येत असल्याचा आरोप शहर कॉंग्रेसने केला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्नात एमएमआरडीएने भाडेतत्वावरील योजनेंतर्गंत सदनिकांची उभारणी केली असून या सदनिका एमएमआरडीएने पालिकेकडे वर्ग केल्या आहेत. मात्र दिवा भागातील सदनिकांच्या वाटपात घोटळा झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी केला आहे. दिवा भागातील सदनिका प्रत्यक्षात पी.ए.पी.च्या लाभाथ्र्याना मिळणो क्र मप्राप्त असतानाही त्या सदनिकांचे वाटप करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या सदनिका देताना खोटी दस्तऐवज, ताबा पावती, बायोमेट्रीक सव्र्हे, चाव्यांचा घोळ मोठया प्रमाणात झालेला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याने घरांमध्ये राहणा:या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा तसेच डायघर पोलीस ठाण्यामध्ये काही दिवसांपुर्वी हा गुन्हा दाखल झाला आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या संगणमताशिवाय हा प्रकार घडू शकत नाही. त्यामुळेच या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून त्यात संबंधितांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. त्यावर येत्या सोमवापर्यंत निर्णय घेतला नाहीतर महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरील योजनेतील सदनिकांच्या वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप ठाणे शहर कॉंग्रेसने केला आहे. खोटे दस्तऐवज, ताबा पावती, बायोमेट्रीक सर्व्हे याआधारे हा घोटाळा झाल्याचा आरोप करीत केवळ कोकणातील दोन मंत्र्यांमुळे या तपासात विघ्न येत असल्याचा धक्कादायक आरोप यावेळी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. तसेच पालिकेतील तीन पदाधिकाऱ्यांचा देखील यात सहभाग असल्याने या प्रकरणाची सीआयडी किंवा सीबीआयकडून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. परंतु ही कारवाई न झाल्यास येत्या २६ जानेवारी रोजी मुक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका