Coronavirus: आणखी दोन कोरोनामुक्त पोलिसांचे जोरदार स्वागत; यंत्रणेला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 00:05 IST2020-05-04T00:04:45+5:302020-05-04T00:05:13+5:30

ठाणे शहर आयुक्तालयात २३ पैकी सहा कर्मचारी आणि चार अधिकारी असे १० जण कोरोनामुक्त झाल्यामुळे ही संख्या १३ झाली आहे.

Coronavirus: Two more coronavirus cops strongly welcomed; Relax the system | Coronavirus: आणखी दोन कोरोनामुक्त पोलिसांचे जोरदार स्वागत; यंत्रणेला दिलासा

Coronavirus: आणखी दोन कोरोनामुक्त पोलिसांचे जोरदार स्वागत; यंत्रणेला दिलासा

ठाणे : वागळे इस्टेट परिमंडळातील वर्तकनगर पोलीस ठाण्यातील दोघे पोलीस कर्मचारी कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यांची तिसरीही चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना शनिवारी घरी सोडले. भार्इंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रातून घरी परतल्यानंतर त्यांचे वर्तकनगर पोलीस तसेच स्थानिक नागरिकांनी पुष्पवृष्टी करीत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. आता कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ही २३ वरून १३ वर आल्यामुळे पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

या दोन कर्मचाऱ्यांसह वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या तीन पोलिसांना १५ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. २९ एप्रिल रोजी एकाची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्याला घरी सोडण्यात आले. दरम्यान, ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अन्य दोघांमध्येही कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाही. त्यामुळे त्यांना भार्इंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते. २ मे रोजी त्यांची तिसरी चाचणीही निगेटिव्ह आली. त्यामुळे दोघांना २ मे रोजी भार्इंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रातून सोडण्यात आले.

ठाणे शहर आयुक्तालयात २३ पैकी सहा कर्मचारी आणि चार अधिकारी असे १० जण कोरोनामुक्त झाल्यामुळे ही संख्या १३ झाली आहे.
कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील २१ अधिकारी आणि ९४ कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाइन तर, नऊ कर्मचाºयांना केंद्रात क्वारंटाइन केले आहे. क्वारंटाइन केलेल्या पोलीस कर्मचाºयांमध्ये वर्तकनगरचे २८ कर्मचारी, मुंब्रा येथील सहा अधिकारी, ३८ कर्मचारी तर मुख्यालयातील २४ कर्मचाºयांचा समावेश आहे.

Web Title: Coronavirus: Two more coronavirus cops strongly welcomed; Relax the system