बदलापूर - बदलापूर शहरातुन मुंबईला प्रवास करणारे मुंबई महापालिकेतील दोन सफाई कामगारांना कोरोनाची लागन झाली आहे. या दोन्ही कामगारांचे नियमित ये-जा सुरु होती. हे दोन्ही रुग्ण तीन दिवसांपूर्वीच मुंबईच्या रुग्णालयात दाखल असुन त्यांचे कारोना नमुने पॉङोटिव्ह आले आहेत. त्यामुळे बदलापूरातील त्यांच्या कुटुंबियांना क्वारंटाईन करन्यात आले आहे.बदलापूर शहराला सर्वात मोठा धोका हा मुंबई आणि ठाण्यात कामासाठी जाणा-या कर्मचा-यांमुळेच आहे. या आधी सापडलेले कोरोनाचे रुग्ण हे मुंबई आणि परिसरातत कामासाठी जाणारेच कर्मचारी होते. आता त्यात आणखी भर पडली आहे. रमेशवाडी आणि गणोशनगर भागात राहणारे दोन सफाई कामगार हे मुंबई महापालिकेत काम करित असतांना त्यांना कोरोनाची लागन झाली आहे. या कोरोना रुग्णांचा संपर्क हा त्यांच्या कु टुंबियांसोबत होता. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तवर दोन्ही कुटुंबियांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
coronavirus : बदलापुरात सापडले कोरोनाचे आणखी दोन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 20:31 IST
बदलापूर शहराला सर्वात मोठा धोका हा मुंबई आणि ठाण्यात कामासाठी जाणा-या कर्मचा-यांमुळेच आहे.
coronavirus : बदलापुरात सापडले कोरोनाचे आणखी दोन रुग्ण
ठळक मुद्देदोन्ही रुग्ण मुंबई महापालिकेतील सफाई कामगारदोन्ही रुग्ण तीन दिवसांपूर्वीच मुंबईच्या रुग्णालयात दाखल बदलापूरातील त्यांच्या कुटुंबियांना क्वारंटाईन करन्यात आले आहे