शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

Coronavirus Thane Updates: काेराेना रुग्णांसाठी आणखी १७० बेडची केली व्यवस्था; टीबी इमारत खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 11:13 PM

जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा निर्णय, जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर एप्रिलमध्ये जिल्ह्यातील पहिले शासकीय कोविड रुग्णालय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय घोषित करण्यात आले.

ठाणे : जिल्ह्यात मागील चार ते पाच महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील टीबीची इमारत चार ते पाच महिन्यांपासून बंद करण्यात आली होती. त्यामुळे ट्रॉमा केअर सेंटरमधील १३० बेडवर उपचार सुरू होते. मात्र, दीड महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने ही टीबीची इमारत पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तेथे १७० बेडची व्यवस्था आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील ३०० बेड पुन्हा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, मुरबाड, शहापूर तालुक्यात कोरोनाचे एकही केंद्र नसल्याने तेथील कोरोना रुग्णांचा भार जिल्हा सामान्य रुग्णालयावर पडत आहे.

जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर एप्रिलमध्ये जिल्ह्यातील पहिले शासकीय कोविड रुग्णालय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय घोषित करण्यात आले. तेव्हा तेथे ३०० बेडची व्यवस्था होती. त्यात कालांतराने रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील ३०० ऐवजी १३० बेड सुरू ठेवून उर्वरित टीबी इमारतीतील बेड बंद ठेवण्यात आले. मात्र, मागील दीड महिन्यापासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. तर, गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या तीन हजारांच्या पार गेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण सेवा बंद केलेल्या १७० बेड पुन्हा रुग्ण सेवेसाठी सुरू करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. गेल्या चार महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील ३०० पैकी १३० बेडवरच रुग्ण सेवा सुरू ठेवण्यात आली होती. 

ग्रामीण भागाचा भार जिल्हा शासकीय रुग्णालयावर जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील कोरोना केंद्रे बंद करण्यात आली होती. मात्र, आता रुग्ण वाढत असून, या तालुक्यांत केंद्र नसल्याने तेथील रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी यावे लागत आहे. त्यामुळे या रुग्णालयावर त्या रुग्णांचा भार पडत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाकडून या तालुक्यांतील केंद्रे पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भाईंदर, नवी मुंबई या शहरांत एकूण ११७ कोरोना अतिदक्षता केंद्रे आहेत. मात्र, ठाणे ग्रामीण क्षेत्रात सध्या एकही अतिदक्षता केंद्र नसल्याने येथील रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या