CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५३४ नवे रुग्ण; २० रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 20:34 IST2021-06-30T20:33:33+5:302021-06-30T20:34:33+5:30
CoronaVirus Thane Updates : ठाणे शहर परिसरात १०६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३३ हजार ३२५ झाली आहे.

CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५३४ नवे रुग्ण; २० रुग्णांचा मृत्यू
ठाणे - ठाणे जिल्ह्यात बुधवारी ५३४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख ३२ हजार ५३३ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात २० रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या १० हजार ६९९ झाली आहे.
ठाणे शहर परिसरात १०६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३३ हजार ३२५ झाली आहे. शहरात तीन मृत्यूंची नोंद आहे. तर कल्याण - डोंबिवलीत १३३ रुग्णांची वाढ झाली असून २ मृत्यूची नोंद आहे. नवी मुंबईत १४६ रुग्णांची वाढ झाली असून ६ मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये १० रुग्ण सापडले असून ३ मृत्यूची नोंद आहे.
भिवंडीत २ बाधीत असून एका मृत्यूची नोंद आहे. मीरा भाईंदरमध्ये ४८ रुग्ण आढळले असून २ मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये १२ रुग्ण आढळले असून १ मृत्यूची नोंद नाही. बदलापूरमध्ये १८ रुग्णांची नोंद असून मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये ५९ नवे रुग्ण वाढले असून २ मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या ३९ हजार २८७ झाली असून २ मृत्यूची नोंद आहे. आतापर्यंत ११८३ मृत्यूंची नोंद आहे.