CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २७८ नवे रुग्ण; ५ रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 20:12 IST2021-09-15T20:11:38+5:302021-09-15T20:12:19+5:30
CoronaVirus Thane Updates : ठाणे शहर परिसरात ४६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३८ हजार १४९ झाली आहे.

CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २७८ नवे रुग्ण; ५ रुग्णांचा मृत्यू
ठाणे - ठाणे जिल्ह्यात बुधवारी २७८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख ५५ हजार ३६८ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ११ हजार ३५९ झाली आहे. ठाणे शहर परिसरात ४६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३८ हजार १४९ झाली आहे. शहरात १ मृत्यूंची नोंद आहे. तर कल्याण - डोंबिवलीत ५७ रुग्णांची वाढ झाली असून २ मृत्यूची नोंद आहे.
नवी मुंबईत ६८ रुग्णांची वाढ झाली असून १ मृत्यूची नोंद आहे. उल्हासनगरमध्ये १३ रुग्ण सापडले असून १ मृत्यूची नोंद आहे. भिवंडीत १ बाधीत असून मृत्यूची नोंद नाही. मीरा भाईंदरमध्ये ४० रुग्ण आढळले असून मृत्यूची नोंद नाही. अंबरनाथमध्ये ७ रुग्ण आढळले असून मृत्यूची नोंद नाही. बदलापूरमध्ये १७ रुग्णांची नोंद असून मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये ३० नवे रुग्ण वाढले असून मृत्यूची नोंद नाही. आता बाधीत रुग्णसंख्या ४० हजार ९९६ झाली आहे. आतापर्यंत १२२० मृत्यूंची नोंद आहे.