CoronaVirus News: राज्यातील 'या' जिल्ह्याला कोरोनाचा वाढता धोका; रुग्णसंख्या मुंबईपेक्षा जास्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 21:32 IST2020-07-14T21:18:19+5:302020-07-14T21:32:08+5:30
मुंबईच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या साडे अकरा हजारांहून अधिक

CoronaVirus News: राज्यातील 'या' जिल्ह्याला कोरोनाचा वाढता धोका; रुग्णसंख्या मुंबईपेक्षा जास्त
मुंबई: लॉकडाऊननंतर आता पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. मात्र आता मुंबईत नव्हे तर ठाण्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. मुंबईच्या तुलनेत ठाण्यात ११ हजार ५३० अधिक कोरोना रुग्ण आहेत. मुंबई शहर उपनगरात २२ हजार ९०० कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर ठाण्यात ३४ हजार ४३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
ठाण्यात बाधितांची संख्या ६५ हजार ३२४ असून २९ हजार ५४८ जण कोविडमुक्त झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७६९ मृत्यू झाले आहेत. मुंबईत दिवसभरात ९५४ रुग्णांची नोंद झाली आहे, तर ७० मृत्यू झाले आहेत. शहर उपनगरातील कोरोना बाधितांची संख्या १ लाखांच्या टप्प्यांवर असून सध्या ९५ हजार १०० रुग्ण आहेत. तर बळींचा आकडा ५ हजार ४०५ वर पोहोचला आहे. शहर उपनगरात २८९ मृत्यू अन्य कारणांमुळे झाले आहेत. सध्या २२ हजार ७७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ६६ हजार ६३३ जण कोविडमुक्त झाले आहेत.
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७० टक्क्यांवर पोहोचला असून मागील आठवड्यात मुंबईतील कोविड वाढीचा दर १.३४ टक्के झाला आहे. शहर उपनगरात रुग्ण दुपटीचा दर ५२ दिवसांवर गेला आहे. आतापर्यंत शहर उपनगरात ४ लाख १ हजार ७४१ कोविडच्या चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ७० मृत्यूंमध्ये ५६ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील ४९ पुरुष व २१ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी २ जणांचे वय ४० वर्षांखालील होते. ४४ जणांचे वय ६० हून अधिक होते. तर उर्वरित २४ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.