शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

coronavirus: ठाणे शहरात रुग्णदुपटीचा कालावधी 299 दिवसांवर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९२ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 00:16 IST

Thane News : रुग्णदुपटीचा कालावधी हा २९९ दिवसांवर आला असल्याने ठाणेकरांसाठी ही समाधानाची बाब आहे. रोजची बाधित रुग्णसंख्यादेखील ३०० वरून १५० च्या आसपास आली आहे.

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनारुग्णांची संख्या कधी वाढताना तर कधी कमी होत आहे. परंतु, रुग्णदुपटीचा कालावधी हा २९९ दिवसांवर आला असल्याने ठाणेकरांसाठी ही समाधानाची बाब आहे. रोजची बाधित रुग्णसंख्यादेखील ३०० वरून १५० च्या आसपास आली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९२ टक्क्यांवर पोहोचले असून, मृत्युदर २.२८ टक्क्यांवर आला आहे. तर रोज रुग्णवाढीचे प्रमाण ७.४६ टक्के एवढे आहे. यामुळे तूर्तास तरी दुसरी लाट दिसत नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी चाचण्यांची संख्या पाच हजारांहून अधिक केली. त्यामध्ये सुरुवातीला दररोज ३०० ते ४०० रुग्ण आढळत होते. मात्र, गेल्या महिनाभरापासून रुग्णसंख्येत घट झाली आहे. आता रोज १५० ते २०० रुग्ण आढळत आहेत. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत सहा लाख ९८ हजार ८९८ कोरोनाचाचण्या केल्या असून, त्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात आतापर्यंत ५२ हजार १५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४९ हजार ५०५ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचे प्रमाण ९४.९२ टक्के इतके आहे. तसेच शहरात आतापर्यंत एक हजार १९१ रुग्ण मृत पावले आहेत. त्याचे प्रमाण २.२८ टक्के इतके आहे. काही दिवसांपूर्वी हेच प्रमाण २.३८ टक्के एवढे होते. त्याचबरोबर शहरात केवळ एक हजार ४६१ रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी रुग्णालयांमध्ये जागा मिळत नव्हती. परंतु, आता रुग्णसंख्या घटल्याने शहरातील रुग्णालयांमधील खाटा रिकाम्या झाल्या आहेत.त्याचबराेबर रुग्णच कमी हाेत असल्याने ठाणे महापालिका प्रशासनाला  माेठा दिलासा मिळाला आहे. 

...तर ४५ जणांना केले  जाते क्वारंटाइनआजही एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला तर त्याच्या संपर्कातील ४५ जणांना क्वारंटाइन केले जात आहे. त्यातही सध्या रुग्णांची संख्या घटत आहे. रुग्णदुपटीचा कालावधी हा २९९ दिवसांवर आला आहे. जो काही दिवसांपूर्वी २२९ दिवसांचा होता. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे