शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

Coronavirus: ‘परराज्यांतून बसने येणाऱ्यांचीही चाचणी करा’; ठाणे महापौरांचं आयुक्तांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 12:32 AM

महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठाणे : परराज्यांतून येणाºया श्रमिक व प्रवाशांची ठाणे रेल्वेस्थानकाबाहेरील सॅटिस थांब्यावर अ‍ॅण्टीजेन तपासणी करून त्यांना शहरात प्रवेश दिला जात आहे. मात्र, ठाणे शहरात अन्य मार्गानेही परराज्यांतील प्रवासी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील पूर्वद्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलाखाली परप्रांतांतून येणाºया अनेक बसेस बेकायदेशीरपणे थांबतात. यातून येणाºया प्रवाशांची कोणतीही आरोग्य तपासणी केली जात नाही. बसथांब्यांच्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा कार्यरत नसल्याने हे प्रवासी शहरात सहज दाखल होत आहेत. या प्रवाशांना अनेक रिक्षावाले कोणतीही खातरजमा न करता इच्छितस्थळी पोहोचवतात. त्यामुळे शहरात कोरोनाचा शिरकाव होऊन प्रादुर्भाव वाढण्याचा धोका संभवतो. या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाण्यात परराज्यांतून बसेस अथवा खाजगी वाहनाने शहरात येणाºया प्रवाशांचेही प्रमाण वाढले आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा दृष्टीने प्रशासन शहरात विविध प्रयत्न करत आहे.दुसरीकडे हे प्रवासी अशाप्रकारे विनातपासणी शहरात येत असून त्यामुळे इतर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून ­याप्रकरणी तातडीने कार्यवाही करावी. तसे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी महापौरांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका