शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

CoronaVirus : कोरोनाच्या संशयातून ठाण्यात सोसायटीने केली मायलेकींना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 12:56 AM

CoronaVirus : वर्तकनगर शिवसेना शाखेजवळील या सोसायटीमध्ये ज्युली फर्नांडिस (२४), तिची बहीण मिली (२२) आणि आई शर्मिला (५८, तिघींच्याही नावात बदल आहे) या गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहेत.

ठाणे : कोरोनाच्या संशयातून ठाण्यातील वर्तकनगर येथील एका ‘सोसायटी’च्या रहिवाशांनी एका हवाई सुंदरीसह तिची बहीण आणि आईला सोसायटीमध्ये गुरुवारी प्रवेश नाकारला होता. शिवसेना पदाधिकारी आणि वर्तकनगर पोलिसांनी यात हस्तक्षेप केल्याने अखेर या तिघींनाही सोयायटीने प्रवेश दिल्यानंतर सुमारे दीड तास चाललेल्या या नाट्यावर पडदा पडला.वर्तकनगर शिवसेना शाखेजवळील या सोसायटीमध्ये ज्युली फर्नांडिस (२४), तिची बहीण मिली (२२) आणि आई शर्मिला (५८, तिघींच्याही नावात बदल आहे) या गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहेत. ज्युली एका खासगी हवाई वाहतूक सेवेच्या कंपनीत हवाई सुंदरी (एअर होस्टेस) म्हणून नोकरी करते. कामाच्या ठिकाणावरून नायगाव हे ठिकाण सोयीचे होत असल्यामुळे ती गेल्या अनेक दिवसांपासून आईसह नायगाव येथे वास्तव्याला होती. परंतु, २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू जाहीर झाला. त्यापाठोपाठ महाराष्टÑात संचारबंदीही लागू झाली. याच दरम्यान, २१ मार्च रोजी ती ठाण्यातील वर्तकनगर येथील घरी आली. ती हवाई वाहतूक तळावर नोकरीला असल्याने तिला कोरोनाची लागण झाल्याची भीती तिच्या इमारतीमधील रहिवाशांना होती. २१ ते २६ मार्च रोजी ती घरात असताना तिने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तिच्यावर या पदाधिकारी आणि रहिवाशांचा आणखीनच संशय बळावला. त्यांनी तिच्यासह संपूर्ण कुटुंबाने कोरोनाची चाचणी करावी, तरच या सोसायटीमध्ये प्रवेश दिला जाईल, असा पवित्रा २६ मार्च रोजी घेतला. सोसायटीने प्रवेशद्वाराला कुलूपही लावल्याने ज्युली आणि तिची आई हतबल झाली. अखेर जवळच्याच ठाणे महापालिकेच्या डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. या रुग्णालयीन कर्मचारी आणि परिचारिका यांनीही ज्युली आणि तिचे कुटुंबीय कोरोना संशयित नसल्याचा निर्वाळा दिला. तसेच असे बेकायदा या कुटुंबाला सोसायटीबाहेर काढता येणार नसल्याचेही कर्मचाºयांनी सुनावले. मात्र, कोरोनाची चाचणी झाल्याशिवाय या कुटुंबाला प्रवेश दिला जाणार नाही. कारण इथे ३९ कुटुंबीयांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याची भीती या सोसायटीतील महिलांनी व्यक्त केली.प्रकरण वर्तकनगर पोलीस ठाण्यापर्यंत गेले. हे कुटुंब गेल्या दोन वर्षांपासून इथे वास्तव्य करीत नाही. पण अचानक इथे आल्यामुळे रहिवाशांच्या मनात भीती निर्माण झाल्याचा दावा सोसायटीच्या पदाधिकाºयांनी केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आणि पोलीस हवालदार खोत आणि स्थानिक बीट मार्शल तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी प्रशांत सातपुते यांनी सोसायटीच्या पदाधिकाºयांना आरोग्य विभाग आणि पोलिसांचा निर्णय मान्य करण्यास सांगून समजूत घातली. त्यानंतर सोसायटीनेही नमते घेऊन ज्युली आणि तिच्या कुटुंबीयांना त्यांच्या घरात तास ते दीड तासाच्या नाट्यानंतर घरात प्रवेश दिला.भीतीमुळे अनेक नागरिक त्रस्तकोरोनामुळे नागरिकांमध्ये अशा प्रकारची नाहक भीती पसरत असल्यामुळेही असेही प्रसंग काहींना अनुभवायला मिळत असल्यामुळे ही वेगळीच चिंता वाढल्याचेही एका पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे