CoronaVirus : कोरोनाच्या संशयातून ठाण्यात सोसायटीने केली मायलेकींना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 12:56 AM2020-03-28T00:56:41+5:302020-03-28T00:56:52+5:30

CoronaVirus : वर्तकनगर शिवसेना शाखेजवळील या सोसायटीमध्ये ज्युली फर्नांडिस (२४), तिची बहीण मिली (२२) आणि आई शर्मिला (५८, तिघींच्याही नावात बदल आहे) या गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहेत.

CoronaVirus: Society ban to mother and daughter from Thane on suspicion of Corona | CoronaVirus : कोरोनाच्या संशयातून ठाण्यात सोसायटीने केली मायलेकींना बंदी

CoronaVirus : कोरोनाच्या संशयातून ठाण्यात सोसायटीने केली मायलेकींना बंदी

Next

ठाणे : कोरोनाच्या संशयातून ठाण्यातील वर्तकनगर येथील एका ‘सोसायटी’च्या रहिवाशांनी एका हवाई सुंदरीसह तिची बहीण आणि आईला सोसायटीमध्ये गुरुवारी प्रवेश नाकारला होता. शिवसेना पदाधिकारी आणि वर्तकनगर पोलिसांनी यात हस्तक्षेप केल्याने अखेर या तिघींनाही सोयायटीने प्रवेश दिल्यानंतर सुमारे दीड तास चाललेल्या या नाट्यावर पडदा पडला.
वर्तकनगर शिवसेना शाखेजवळील या सोसायटीमध्ये ज्युली फर्नांडिस (२४), तिची बहीण मिली (२२) आणि आई शर्मिला (५८, तिघींच्याही नावात बदल आहे) या गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहेत. ज्युली एका खासगी हवाई वाहतूक सेवेच्या कंपनीत हवाई सुंदरी (एअर होस्टेस) म्हणून नोकरी करते. कामाच्या ठिकाणावरून नायगाव हे ठिकाण सोयीचे होत असल्यामुळे ती गेल्या अनेक दिवसांपासून आईसह नायगाव येथे वास्तव्याला होती. परंतु, २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू जाहीर झाला. त्यापाठोपाठ महाराष्टÑात संचारबंदीही लागू झाली. याच दरम्यान, २१ मार्च रोजी ती ठाण्यातील वर्तकनगर येथील घरी आली. ती हवाई वाहतूक तळावर नोकरीला असल्याने तिला कोरोनाची लागण झाल्याची भीती तिच्या इमारतीमधील रहिवाशांना होती. २१ ते २६ मार्च रोजी ती घरात असताना तिने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तिच्यावर या पदाधिकारी आणि रहिवाशांचा आणखीनच संशय बळावला. त्यांनी तिच्यासह संपूर्ण कुटुंबाने कोरोनाची चाचणी करावी, तरच या सोसायटीमध्ये प्रवेश दिला जाईल, असा पवित्रा २६ मार्च रोजी घेतला. सोसायटीने प्रवेशद्वाराला कुलूपही लावल्याने ज्युली आणि तिची आई हतबल झाली. अखेर जवळच्याच ठाणे महापालिकेच्या डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. या रुग्णालयीन कर्मचारी आणि परिचारिका यांनीही ज्युली आणि तिचे कुटुंबीय कोरोना संशयित नसल्याचा निर्वाळा दिला. तसेच असे बेकायदा या कुटुंबाला सोसायटीबाहेर काढता येणार नसल्याचेही कर्मचाºयांनी सुनावले. मात्र, कोरोनाची चाचणी झाल्याशिवाय या कुटुंबाला प्रवेश दिला जाणार नाही. कारण इथे ३९ कुटुंबीयांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याची भीती या सोसायटीतील महिलांनी व्यक्त केली.
प्रकरण वर्तकनगर पोलीस ठाण्यापर्यंत गेले. हे कुटुंब गेल्या दोन वर्षांपासून इथे वास्तव्य करीत नाही. पण अचानक इथे आल्यामुळे रहिवाशांच्या मनात भीती निर्माण झाल्याचा दावा सोसायटीच्या पदाधिकाºयांनी केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आणि पोलीस हवालदार खोत आणि स्थानिक बीट मार्शल तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी प्रशांत सातपुते यांनी सोसायटीच्या पदाधिकाºयांना आरोग्य विभाग आणि पोलिसांचा निर्णय मान्य करण्यास सांगून समजूत घातली. त्यानंतर सोसायटीनेही नमते घेऊन ज्युली आणि तिच्या कुटुंबीयांना त्यांच्या घरात तास ते दीड तासाच्या नाट्यानंतर घरात प्रवेश दिला.

भीतीमुळे अनेक नागरिक त्रस्त
कोरोनामुळे नागरिकांमध्ये अशा प्रकारची नाहक भीती पसरत असल्यामुळेही असेही प्रसंग काहींना अनुभवायला मिळत असल्यामुळे ही वेगळीच चिंता वाढल्याचेही एका पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: CoronaVirus: Society ban to mother and daughter from Thane on suspicion of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.