शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

coronavirus : ठाण्यात दुध विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 1:08 PM

दूध विक्री करताना ग्राहकांची  मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे .

ठाणे - कळव्यातील दोन दूध विक्रेत्यांवर कळवा पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे . हे दोन्ही दूध विक्रेते पारसिक नगर येथे राहणारे असून कळवा नाक्यावर दूध विक्री करताना ग्राहकांची  मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने पोलिसांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे .  पोलिसांच्या या कारवाईमुळे दूध विक्रेता संघाकडून मात्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दूध ही अत्यावश्यक सेवा असताना जर पोलिसांकडून अशा प्रकारची कारवाई करण्यात येत असेल तर दूध विक्री बंद करण्याचा इशारा दूध विक्रेता संघाकडून देण्यात आला आहे . त्यामुळे येत्या काही काळात नागरिकांना दूध मिळणे  देखील बंद होण्याची चिन्हे आहेत.  सुधाकर एकसिंघे (५५) आणि संतोष पवार (४४) अशी कारवाई  करण्यात आलेल्या दोघांची नावे असून हे दोघेही पारसिक नगर येथे राहणारे आहेत . कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी तसेच संचार बंदी लागू केली असताना या दोघांनी सकाळी कळवा नाका या ठिकाणी दूध विकण्यासाठी दुधाच्या पेट्या ठेवल्या होत्या .  त्या ठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. गर्दी करू नका अशी विनंती देखील दूध विक्रेत्यांकडून करण्यात आल्यानंतरही आजूबाजूच्या सोसायटीमधील नागरिकांनी दूध घेण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे  कळवा पोलिसांनी या दोघांवरही  १०७ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई तसेच वाहतुकीला अडथळा झाला म्हणून कारवाई करावी लागाली. या दोघांनाही  पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली असून यापुढे अशा प्रकारचे वर्तन होणार नाही असे लेखी स्वरूपात त्यांच्याकडून लिहून घेण्यात आल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले . पोलिसांच्या या कारवाईमुळे  दूध विक्रेता संघामध्ये  मात्र नाराजीचे वातावरण आहे . संचारबंदीमधून अत्यावश्यक सेवा वगळव्यात आल्या आहेत . तरीही दूध विक्रेत्यांवर अशा प्रकारची कारवाई करणे योग्य नसल्याचे दूध विक्रेता संघांचे पदाधिकारी तसेच गोकुळ आणि महानंदा चे वितरक कृष्णा पाटील यांचे म्हणणे आहे .जमावबंदी आणि  संचारबंदीमुळे दुधाची विक्री करण्यासाठी ड्रायव्हर देखील मिळत नाही. त्यामुळे दूध येण्यास देखील विलंब होत असून दूध येण्यास उशीर होत असल्याने ग्राहकांची गर्दी होत आहेत. ७० टक्के दूध हे रस्त्यावर आणि सकाळच्या वेळेसच विकले जाते. त्यामुळे दूध विक्रेत्यांना ओळखपत्र देण्यात यावे अशी मागणी आपण करत असून दूध विक्रेत्यांवर अशीच कारवाई सुरु राहिली तर नाईलाजास्तव दूध विक्री बंद करावी लागेल असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे .

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस