CoronaVirus News: कल्याण डोंबिवलीत आज सर्वाधिक ४८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 20:58 IST2020-05-21T20:45:54+5:302020-05-21T20:58:29+5:30

आज नव्याने 48 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 642 झाली आहे.

CoronaVirus News: Two killed by corona in Kalyan Dombivali; The death toll rose to 17 mac | CoronaVirus News: कल्याण डोंबिवलीत आज सर्वाधिक ४८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; दोघांचा मृत्यू

CoronaVirus News: कल्याण डोंबिवलीत आज सर्वाधिक ४८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; दोघांचा मृत्यू

कल्याण: कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 15 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आत्ता मृतांची संख्या 17 झाली आहे. आज नव्याने 48 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 642 झाली आहे. एकाच दिवसात 48 रुग्ण आढळून आल्याचा आत्तार्पयतचा सगळ्यात मोठा आकडा आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीची चिंता वाढली आहे.

डोंबिवली पश्चिमेतील 63 वर्षीय आणि आंबिवलीतील 57 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सहा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. ती कल्याण पूव्रेतील श्रीराम कॉलनीत राहणारी आहे. 10 वर्षाच्या मुलालाही कोरोना झाला आहे. हा मुलगाही श्रीराम कॉलनीत राहणारा आहे. सहा वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. तो लोकधारा येथे राहणारा आहे.

8 रुग्णांपैकी डोंबिवली पश्चिमेतील 8, डोंबिवली पूव्रेतील 9 जण, कल्याण पश्चिमेत 13 जण आणि कल्याण पूव्रेत 15 जण, टिटवाळ्यात दोन आणि शहाड परिसरातील एक जणाला कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 17 महिला व 23 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यत एकूण उपचार घेत असलेल्या 242 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 383 आहे. उपचारांती बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी 37.69 आहे.

Web Title: CoronaVirus News: Two killed by corona in Kalyan Dombivali; The death toll rose to 17 mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.