शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Thane : मृत्यूच्या दाढेतून उमेदीने बाहेर आलोय!- गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 04:56 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : हॉस्पिटलमध्ये असताना मी माझ्या मुलीला नताशाला व्हिडिओ कॉल केला तेव्हा घरातील सर्व मंडळी मला दिसत होती; पण माझी पत्नी मला तिथे दिसत नव्हती.

- अजित मांडकेठाणे : कोरोनाची लागण झाल्याने चार दिवस मी व्हेंटिलेटरवर होतो. त्यावेळी डॉक्टरांनी माझ्या जगण्याची केवळ ३० टक्केच शक्यता असल्याचे सांगितले होते. तशी माहिती त्यांनी माझ्या मुलीला दिली; परंतु डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आणि माझ्या मुलीने दिलेल्या जगण्याच्या उमेदीमुळे मी आज पुन्हा तुमच्यात आलो आहे, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.हॉस्पिटलमध्ये असताना मी माझ्या मुलीला नताशाला व्हिडिओ कॉल केला तेव्हा घरातील सर्व मंडळी मला दिसत होती; पण माझी पत्नी मला तिथे दिसत नव्हती. त्यामुळे मी पत्नीची चौकशी करताच मुलीने मला सांगितले की, ती बाजूच्या खोलीत आहे; परंतु ती तिथे नव्हती, तर तीसुद्धा रुग्णालयात कोरोनाशी लढा देत होती. माझी मुलगी त्या क्षणाला प्रसंगावधान राखून माझ्याशी खोटं बोलली. आज जेव्हा मी या घटनेचा विचार करतो तेव्हा कमी वयात तिची मॅच्युरिटी पाहून मला सुखद धक्का बसला. तो सगळा प्रसंग आठवला तरी मन आजही हळवे होते. आता पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात करताना आयुष्यात खाण्यापिण्याची शिस्त बाळगण्याचे व अतिआत्मविश्वास न ठेवण्याचे, बेफिकिरीने न वागण्याचे मी निश्चित केले आहे.आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली आणि जवळजवळ ते २० ते २२ दिवस मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल होते. या कालावधीत त्यांनी मरणावर मात केली. कोरोनाचा प्रकोप वाढत असताना मास्क, हँडग्लोव्हज यांचा वापर करायला हवा होता. मात्र, मी बेदरकारीतून ही बंधने पाळली नाहीत. घरचे सांगत असतानाही मी त्यांचे ऐकले नाही. अंगात थकवा होता, तो जाणवत होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले.मुलगी इस्पितळात दाखल होण्यास सांगत होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर मला केव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले, माझा रिपोर्ट केव्हा पॉझिटीव्ह आला, रुग्णालयात मी व्हेंटीलेटरवर असताना त्या तीन ते पाच दिवसात काय काय घडामोडी घडल्या, हे मला काहीच माहित नाही. कारण त्या पाच दिवस माझी मृत्युशी झुंज सुरु होती.मी व्हेंटींलेटवर असताना माझी प्रकृती पाहून डॉक्टरांनी माझ्या जगण्याची केवळ ३० टक्केच शक्यता असल्याचे माझ्या मुलीला बोलावून सांगितले होते.डॉक्टरांचे प्रयत्न, मुलीने जगण्याची दिलेली उमेद, माझी जगण्याची चिकाटी यामुळे मी काही दिवसांनंतर आयसीयुमधून बाहेर आलो. त्यानंतर मला समजत होते, परंतु मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. परंतु त्यामुळे माझ्या डोक्यात अनेक चित्रविचित्र विचार थैमान घालतहोते.यातूनच त्याच वेळेस मी माझे मृत्युपत्र तयार केले. माझ्या पश्चात माझी संपत्ती मुलीच्या नावे करण्याचेही मी लिहून ठेवले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना मी सलाम करतो, त्यांनी केलेल्या सेवा सुश्रूषेमुळे, त्यांनी दाखविलेल्या आपुलकीमुळे, नर्सेसेने घेतलेल्या काळजीमुळेच मी आज पुन्हा घरी परतलो आहे.कोरोना या आजाराची दाहकता, गांभीर्य मला जाणवले आहे. त्यामुळे माझे सर्वांना सांगणे आहे की, गरज असेल तरच बाहेर पडा. अन्यथा बाहेर पडू नका. आज मी बरा झालो आहे, आता कुटुंबासोबत माझा वेळ घालवत आहे, यापूर्वी कधीही मी कुटुंबासाठी किंवा मुलीसाठी एवढा वेळ दिलेला नाही; परंतु आता घरी काय बनवायचे, त्याचे नियोजन आम्ही करीत आहोत. अतिआत्मविश्वास किती घातक ठरू शकतो हाच धडा कोरोनाने मला शिकवला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड