Coronavirus News: कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा ठाणे पोलिसांनी केला पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:55 IST2020-07-23T00:46:28+5:302020-07-23T00:55:15+5:30
कोरोनावरील टोकलीझुमॅब आणि रेमडिसिविर या इंजेक्शनची काळया बाजारामध्ये विक्री करणा-या पाच जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. एका डमी गिºहाईकाच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली.

जादा दराने विक्री करतांना पाच जणांना पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनावरील जीवनरक्षक ठरलेल्या औषधांचा प्रचंड तुटवडा मुंबई ठाण्यात जाणवत असतांनाच टोकलीझुमॅब आणि रेमडिसिविर या इंजेक्शन काळया बाजारामध्ये चढया दराने विक्री करणाºयाअरुण सिंग (३५, रा. घाटकोपर, मुंबई) याच्यासह पाच जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून दोन रेमडिसिविरसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनावरील ४० हजारांना विक्री किंमत असलेल्या टोकलीझुमॅब या इंजेक्शनची ८० हजारांमध्ये तर तीन हजारांमध्ये मिळणाºया रेमडिसिवीरची थेट आठ पटीपेक्षा जास्त म्हणजे २५ हजारांमध्ये विक्री होत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोथमिरे यांच्या पथकाने २१ जुलै रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. अरुण सिंग याच्यासह काहीजण रेमडिसिविर आणि टोकलिझुमॅब या अत्यावश्यक इंजेक्शनचा काळया बाजारामध्ये चढया दराने विक्री करण्यासाठी ठाण्यातील तीन पेट्रोल पंप येथे येणार असल्याची खंडणी विरोधी पथ्काला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह खंडणी विरोधी पथकाने अरुण सिंग तसेच सुधाकर गिरी (३७, रा. मुंबई), रवींद्र शिंदे (३५, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई), बसीम शेख,(३२, रा. नवी मुंबई) आणि अमीताब दास (३९, रा. नवी मुंबई) या पाच जणांनरा अटक केली. त्यांच्याकडून दोन रेमडिसिविर, एक टॉकलिझुमॅब इंजेक्शन तसेच इतर कॅन्सर आणि गर्भपाताची औषधे त्याचबरोबर गुन्हयात वापरलेली मोटारकार आणि मोबाईल फोन असा सुमारे पाच लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी औषध निरीक्षक वीरेंद्र रवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नौपाडा पोलीस ठाण्यात कलम ४२० तसेच औषध किंमत नियंत्रण आदेश तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आाहे.
* अशा प्रकारे कोणाचीही या औषधांबाबत जर फसवणूक झाली असेल त्या नागरिकांनी खंडणी विरोधी पथकाकडे ०२२- २५३४८३३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.