शहरं
Join us  
Trending Stories
1
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
2
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
3
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
4
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
6
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
7
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
8
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
9
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
10
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
11
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
12
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
13
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
14
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
15
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
16
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
17
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
18
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
19
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
20
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल

CoronaVirus News in Thane : ठाण्यात हॉस्पिटलबाहेर तडफडून वृद्धाचा मृत्यू, सलग दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 1:55 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : शांतीनगर येथे राहणाऱ्या या ७० वर्षांच्या वृद्धाची प्रकृती बिघडली होती. त्यांना सलग दोन दिवसांपासून ताप येत होता. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती.

ठाणे : वागळे इस्टेट भागात एका वृद्धाचा रस्त्यावर तडफडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच येथील श्रीनगर येथे आणखी एका वृद्धाचा रुग्णालयाबाहेरील स्ट्रेचरवरच तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली. शहरातील कोरोनाग्रस्तांसाठी अ‍ॅम्ब्युलन्स व रुग्णालयाची व्यवस्था करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचे या घटनांवरून दिसले. सदर रुग्णाला दोन दिवसांपासून जागेअभावी दाखल केले नव्हते. तर पाचपाखाडी येथील रुग्णालयात त्याला नेल्यानंतर सामान्य की आयसीयू असा घोळ घालून वेळेवर उपचार न केल्यामुळे त्यांना हॉस्पिटलबाहेरच प्राण गमवावे लागले.शांतीनगर येथे राहणाऱ्या या ७० वर्षांच्या वृद्धाची प्रकृती बिघडली होती. त्यांना सलग दोन दिवसांपासून ताप येत होता. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती.पहिल्या दिवशी त्यांच्या मुलाने पालिकेकडे अ‍ॅम्ब्युलन्स व रुग्णालयाचे नाव देण्याची विनंती केली. मात्र, प्रशासनाने काहीही न कळविल्याने त्याने थेट एका रुग्णालयात संपर्क साधून वडिलांना दाखल करण्याची विनंती केली. परंतु, महापालिकेच्या डॉक्टरांनी फोन केल्याशिवाय आम्ही कोणालाही दाखल करून घेणार नाही, असे त्या रुग्णालयाने सांगितले.त्यानंतर गुरुवारी सायंकाळी नगरसेवक नारायण पवार यांनी डॉ. राजू कोर्डे यांच्याशी संपर्क साधून त्या वृद्धाला दाखल करण्याची विनंती केली. अखेर पाचपाखाडी येथील एका रुग्णालयात रात्री नऊच्या सुमारास सामान्य कक्षात जागा असल्याचे महापालिकेने सांगितल्यावर वृद्धाला तेथे नेले. मात्र, लगेचच दाखल करून न घेतल्याने त्यांची प्रकृती बिघडली. काही काळानंतर तेथील डॉक्टरांनी या रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्याची गरज आहे. मात्र, आमच्याकडे जागा शिल्लक नाही. तुम्ही दुसºया हॉस्पिटलमध्ये चौकशी करा, असे सांगितले. या दरम्यानच उपचाराअभावी त्या वृद्धाचा स्ट्रेचरवरच तडफडून मृत्यू झाल्याचे पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.अ‍ॅम्ब्युलन्सअभावी रुग्णालयातून डिस्चार्ज थांबविलेमहापालिका क्षेत्रात अ‍ॅम्ब्युलन्सची संख्या कमी असल्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची ने-आण करण्यात अडचणी येत आहेत. पाचपाखाडीतील एका रुग्णालयात गुरुवारी दुपारी चार रुग्णांचा डिस्चार्ज झाला होता. मात्र, ते महापालिकेची अ‍ॅम्ब्युलन्स नसल्यामुळे रुग्णालयातच थांबले होेते. त्यांना खासगी रुग्णवाहिकांच्या चालकाने १० ते १५ हजार रु पये दर सांगितला होता. त्यामुळे नाइलाजास्तव सर्व रुग्ण ताटकळत होते. पर्यायाने कोरोनाच्या अन्य रुग्णांनाही दाखल केले जात नव्हते. त्यामुळे महापालिका व रुग्णालय यांच्यात समन्वय नसल्याने संबंधित रुग्णालयांच्या व्यवस्थापनानेच अ‍ॅम्ब्युलन्सने रुग्णांना घरी सोडण्याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.मनसेचे ठिय्या आंदोलनरुग्णवाहिकेअभावी रस्त्यावर तडफडून होणारे मृत्यू, बेडची कमी संख्या आणि प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार या सर्वांचा निषेध म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिका मुख्यालयात आयुक्त विजय सिंघल यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस