CoronaVirus News In Thane: 6176 new patients of Corona in Thane district! | CoronaVirus News In Thane : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ६१७६ नव्या रुग्णांची वाढ!

CoronaVirus News In Thane : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ६१७६ नव्या रुग्णांची वाढ!

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या सहा हजार १७६ रूग्ण शुक्रवारी नव्याने वाढल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली. याशिवाय, गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत आज प्रथमच मृतांची संख्या तब्बल २६ जणांच्या मृत्यूने वाढली आहे. जिल्ह्यात आता तीन लाख ६७ हजार ६१० रुग्ण संख्या झाली असून मृत्यू सहा हजार ६६४ मृत्यूची नोंद झाली आहे. (CoronaVirus News In Thane: 6176 new patients of Corona in Thane district!)

ठाणे शहरात एक हजार ८२५ रुग्ण आढळले आहेत. यासह शहरात ९२ हजार ५६२ रुग्णांची नोंद झालेली आहे. तर, सहा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ४९३ झाली. कल्याण - डोंबिवलीत सर्वाधिक दोन हजार १९ रुग्ण वाढल्यामुळे प्रशासनाची चिंताही वाढली आहे. आज चार जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता ९१ हजार  ७७७ बाधित असून एक हजार २८६ मृत्यू झाले आहेत.

उल्हासनगरमध्ये २५५ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. आता या शहरात १५ हजार ५८६ बाधित नोंदले असून मृत्यू संख्या ३८५ झाली आहे. भिवंडी परिसरात ९५ रुग्ण असून तीन मृत्यू आहे. येथे आता आठ हजार ४९४ बाधितांची तर ३७० मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदरला ३९७  रुग्ण सापडले असून पाच मृत्यू झाले. या शहरात आता ३४ हजार १७४ बाधितांसह ८५२ मृतांची संख्या नोंदली आहे. 

अंबरनाथला २२२ रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता १३ हजार ९ बाधितांसह मृतांची संख्या ३२२ आहे. बदलापूरला १९० रुग्ण आज सापडले असून १४ हजार २७३ बाधित आहे. येथे एकही मृत्यू न झाल्याने मृत्यूची संख्या १२६ आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये १४० रुग्णांचा शोध लागला असून तीन मृत्यू आहे. या गांवपाड्यांत आतापर्यंत २१ हजा ९२५ बाधित झाले असून ६१९ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: CoronaVirus News In Thane: 6176 new patients of Corona in Thane district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.