शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
4
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
5
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
6
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
7
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
8
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
9
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
10
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
11
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
12
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
13
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
14
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
15
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
16
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
17
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
18
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
19
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
20
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ

CoronaVirus News in Thane : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात आढळले ३९८ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 02:12 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : ठामपामध्ये १९७ रुग्ण मिळाल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या एक हजार ७५७ इतकी झाली आहे. तसेच दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५३ झाली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच असून शुक्रवारी विक्रमी ३९८ बाधितांची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या ५ हजार ६८ वर पोहोचली आहे. शुक्रवारी एकट्या ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक १९७ रुग्ण मिळाले आहेत. भिवंडीत शुक्रवारी एकही नविन रुग्ण आढळला नाही. तर केडीएमसीतील एकूण रुग्ण संख्या ७०० वर गेली आहे. त्याचबरोबर ठामपात दोघांचा तर केडीएमसी आणि बदलापूर येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.ठामपामध्ये १९७ रुग्ण मिळाल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या एक हजार ७५७ इतकी झाली आहे. तसेच दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५३ झाली. त्याच्या पाठोपाठ नवी मुंबईत ६३ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या एक हजार ४८५ वर गेली आहे.तर कल्याण डोंबिवलीत ५८ नवे रुग्ण मिळाल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या ७०० झाली असून एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या १८ झाली आहे. मीरा भार्इंदर येथे ५१ रुग्ण सापडले असून त्या ठिकाणच्या रुग्णांची संख्या ४५४ वर पोहोचली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ११ रुग्ण मिळून आल्याने एकूण रुग्ण संख्या २४३ झाली आहे. बदलापूर येथे १० रुग्ण सापडले असून तेथील संख्या २४७ झाली असून एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४ झाली आहे.अंबरनाथ येथे ६ रुग्ण आढळले असून तेथील रुग्ण संख्या ५४ झाली आहे. उल्हासनगरमध्ये २ रुग्णांचे निदान झाल्याने एकूण रुग्ण संख्या १५६ वर गेली आहे. भिवंडीत एकही रुग्ण न सापडल्याने एकूण रुग्ण संख्या ८२ वर स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस