Coronavirus News:राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड: ताडीची विक्री करणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 00:20 IST2020-07-03T00:17:28+5:302020-07-03T00:20:07+5:30
लॉकडाऊनच्या काळात चक्क घरातून ताडीची विक्री करणा-या तीन ताडी विक्रेत्यांना ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने घणसोलीतून अटक केली. त्यांच्याकडून स्कूटरसह ६४० लीटर दारुही गुरुवारी जप्त केली आहे.

६४० लीटर ताडी आणि दुचाकीही जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताडी विक्रीला बंदी असतांनाही बेकायदेशीरपणे ताडीची विक्री करणाºया गंगाधर गुंडेडी याच्यासह तिघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याठाणे पथकाने गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून एका स्कूटरसह ६४० लीटर ताडीही जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नवी मुंबईतील घणसोली येथील एका पत्र्याच्या घरात दुर्गा मंदिराजवळ अवैधपणे ताडी विक्री सुरु असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नितीन घुले यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे २ जुलै रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क ठाणे डी विभागाचे निरीक्षक महेश बोज्जावार आणि दुय्यम निरीक्षक योगेश सावखेडकर, जवान प्रदीप महाजन, रणजीत नायगावकर आणि दीपक वाडेकर यांच्या पथकाने स्कूटर, ताडीसह ४९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गंगाधर याच्यासह दिगंबर इडीटिवार आणि गरवेदूला वामशीकृष्ण अशी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध रबाले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.