Coronavirus News: Police Head constable dead due to Corona in Thane | Coronavirus News: ठाण्यात महिला निरीक्षकासह सहा पोलीस कोरोनामुळे बाधित: हवालदाराचा मृत्यु

पोलिसांच्या वाढत्या मृत्यूमुळे चिंता

ठळक मुद्देआतापर्यंत आयुक्तालयात २९ पोलिसांचा मृत्युपोलिसांच्या वाढत्या मृत्यूमुळे चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात एका महिला पोलीस निरीक्षकासह सहा पोलीस नव्याने कोरोनामुळे बाधित झाले. तर वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार हरिनाम गायकवाड (५१) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे पोलिसांच्या मृत्यूंची संख्या २९ झाली आहे.
गेल्या दोन दिवसांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक, वर्तकनगरचे उपनिरीक्षक, शिवाजीनगर आणि मुख्यालयाचे प्रत्येकी एक जमादार तसेच मुंब्रा आणि विष्णुननगर येथील प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी असे सहा पोलीस कोरोनामुळे बाधित झाले. दरम्यान, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे हवालदार गायकवाड यांचा २१ आॅक्टोबर रोजी कोरोनावर उपचार सुरु असतांना मृत्यु झाला. लोकमान्यनगर पाडा क्रमांक एक येथील रहिवासी असलेल्या गायकवाड यांना ९ आॅक्टोबर रोजी ताव आणि अशक्तपणा जाणवला होता. त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना वेदांत अ‍ॅव्हेन्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतांना त्यांची प्रकृती गंभीर होऊन त्यांचा २१ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Coronavirus News: Police Head constable dead due to Corona in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.