शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

CoronaVirus News: खासगी रुग्णालयांकडे रुग्णांची पाठ; गतवर्षीच्या लुटीच्या कहाण्यांमुळे भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 1:33 AM

मनपाच्या कोविड रुग्णालयातच हवे उपचार

- मुरलीधर भवारकल्याण : कोरोनाच्या पहिल्या लाटेत खासगी रुग्णालयांनी केलेल्या लुटमारीच्या सुरस व चमत्कारिक कथा सर्वश्रुत असल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांचा खासगी रुग्णालयांची पायरी न चढण्याकडे कल आहे. कल्याण-डोंबिवली शहरांत दररोज नवे हजारेक रुग्ण आढळत असून बहुतांश रुग्णांना केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात उपचार घ्यायचे असल्याने तेथे रुग्णांची तुफान गर्दी झाली आहे तर खासगी कोविड रुग्णालयात २११ बेड चक्क रिक्त आहेत. केडीएमसीच्या रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांच्या नातलगांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत असतानाही रुग्ण खासगी रुग्णालयांत दाखल होण्यास तयार नाहीत.केडीएमसी हद्दीत काही खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांनी बेडची चौकशी केली असता त्यांना बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. मंत्रालयात कार्यरत असलेले आणि कल्याणमध्ये राहणारे कर्मचारी व त्यांच्या पत्नीलाही कोरोना झाला आहे. त्यांनी बेडची विचारणा केली असता त्यांना खासगी रुग्णालयात दुपारपर्यंत बेड उपलब्ध झालेला नव्हता. त्यांनी महापालिकेच्या आरोग्य खात्याशी संपर्क साधला असता आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांनी होलिक्रॉस, आयुष आणि अन्य एका खासगी रुग्णालयात चौकशी केली असता त्याठिकाणी बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी अन्य काही खासगी रुग्णालयांत २११ बेड शिल्लक आहेत. खासगी रुग्णालयात बेड शिल्लक असताना रुग्णांचा सरकारी कोविड रुग्णालयात प्रवेश मिळावा याकडे अधिक कल दिसून येतो. कारण सरकारी रुग्णालयात उपचार मोफत मिळतात तर खासगी रुग्णालये बिलाकरिता मानेवर सुरा फिरवतात, असे रुग्णांच्या नातलगांचे म्हणणे आहे. भरमसाट बिलाची भीती मनातून काढून टाकामागच्या वर्षी खासगी रुग्णालयांनी बिलापोटी रुग्णांची लूट केली होती. खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लूट करू नये याकरिता मनपाने पुन्हा खासगी रुग्णालयात ऑडिटर्सची नियुक्त्या केली आहे. सरकारी नियमानुसार बिल आकारले जात आहे की नाही याची दाद मागण्यासाठी हे ऑडिटर्स नेमले असल्याने नागरिकांनी भरमसाट बिलाची भीती मनातून काढून टाकावी, असे आवाहन मनपाने केले आहे.८० टक्के बेड कोविड रुग्णांसाठी आरक्षित महापालिका हद्दीत आजमितीस ४० खासगी रुग्णालयांत कोविड रुग्णांवर उपचार करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. एखाद्या रुग्णालयाने परवानगी मागितल्यास त्याच दिवशी परवानगी दिली जात आहे. खासगी रुग्णालयातील एकूण बेडपैकी ८० टक्के बेड हे कोविड रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आलेले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या