शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात एक हजार ९८१ नव्या बाधीतांसह ३७ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 23:17 IST

ठाणे जिल्हयात गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ९८१ नविन कोरोना बाधित रु ग्णांची तर ३७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६० हजार ४८८ तर मृतांची संख्या एक हजार ७२६ इतकी झाली.

ठळक मुद्देदोन दिवसांनंतर पुन्हा रुग्णांची संख्या वाढलीबाधितांची संख्या ६० हजार ४८८ तर मृतांची संख्या एक हजार ७२६

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गेल्या दोन दिवसांपासून नियंत्रणात येत असलेली कोरोना बाधितांच्या संख्येत बुधवारी पुन्हा वाढ झाली. ठाणे जिल्हयात गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ९८१ नविन कोरोना बाधित रु ग्णांची तर ३७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६० हजार ४८८ तर मृतांची संख्या एक हजार ७२६ इतकी झाली आहे.कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या क्षेत्रात बुधवारी देखिल सर्वाधिक ४९८ नविन रुग्णांची तर नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १४ हजार ७४ तर मृतांची संख्या २१६ इतकी झाली. त्यापाठोपाठ ठाणे महानगर पालिकेच्या क्षेत्रात बाधितांची ४०० तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. याठिकाणी आता बाधितांची संख्या १४ हजार ४१९ तर मृतांची संख्या ५३० वर पोहचली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात ५३६ रु ग्णांची तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या दहा हजार २७३ झाली असून मृतांची संख्या ३१८ वर पोेहचली आहे. मीरा भार्इंदरमध्येही नव्याने ९९ रु ग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या पाच हजार ९५० तर मृतांची संख्या २१० इतकी झाली. त्याचप्रमाणे भिवंडी महापालिका क्षेत्रात ५४ बाधीतांची तर सहा सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार ९०४ तर मृतांची संख्या १५४ वर पोहोचली आहे. उल्हासनगरमध्ये नविन २२६ रु ग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या चार हजार ८४४ तर, मृतांची संख्या ७४ झाली आहे. अंबरनाथमध्ये ५५ रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या दोन हजार ८२९ झाली आहे. बदलापूरमध्ये नविन ८९ रु ग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांचा आकडा एक हजार ६१३ इतका झाला. याशिवाय, ठाणे ग्रामीण भागात २०४ रु ग्णांची भर पडली असून तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ५८२ तर मृतांची संख्या ९६ वर पोहचली आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य