Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात एक हजार ९८१ नव्या बाधीतांसह ३७ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 11:13 PM2020-07-15T23:13:20+5:302020-07-15T23:17:09+5:30

ठाणे जिल्हयात गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ९८१ नविन कोरोना बाधित रु ग्णांची तर ३७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६० हजार ४८८ तर मृतांची संख्या एक हजार ७२६ इतकी झाली.

Coronavirus News: One thousand 981 new infections and 37 deaths in Thane district | Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात एक हजार ९८१ नव्या बाधीतांसह ३७ जणांचा मृत्यू

बाधितांची संख्या ६० हजार ४८८ तर मृतांची संख्या एक हजार ७२६

Next
ठळक मुद्देदोन दिवसांनंतर पुन्हा रुग्णांची संख्या वाढलीबाधितांची संख्या ६० हजार ४८८ तर मृतांची संख्या एक हजार ७२६

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून नियंत्रणात येत असलेली कोरोना बाधितांच्या संख्येत बुधवारी पुन्हा वाढ झाली. ठाणे जिल्हयात गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ९८१ नविन कोरोना बाधित रु ग्णांची तर ३७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६० हजार ४८८ तर मृतांची संख्या एक हजार ७२६ इतकी झाली आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या क्षेत्रात बुधवारी देखिल सर्वाधिक ४९८ नविन रुग्णांची तर नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १४ हजार ७४ तर मृतांची संख्या २१६ इतकी झाली. त्यापाठोपाठ ठाणे महानगर पालिकेच्या क्षेत्रात बाधितांची ४०० तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. याठिकाणी आता बाधितांची संख्या १४ हजार ४१९ तर मृतांची संख्या ५३० वर पोहचली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात ५३६ रु ग्णांची तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या दहा हजार २७३ झाली असून मृतांची संख्या ३१८ वर पोेहचली आहे. मीरा भार्इंदरमध्येही नव्याने ९९ रु ग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या पाच हजार ९५० तर मृतांची संख्या २१० इतकी झाली. त्याचप्रमाणे भिवंडी महापालिका क्षेत्रात ५४ बाधीतांची तर सहा सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार ९०४ तर मृतांची संख्या १५४ वर पोहोचली आहे. उल्हासनगरमध्ये नविन २२६ रु ग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या चार हजार ८४४ तर, मृतांची संख्या ७४ झाली आहे. अंबरनाथमध्ये ५५ रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या दोन हजार ८२९ झाली आहे. बदलापूरमध्ये नविन ८९ रु ग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांचा आकडा एक हजार ६१३ इतका झाला. याशिवाय, ठाणे ग्रामीण भागात २०४ रु ग्णांची भर पडली असून तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ५८२ तर मृतांची संख्या ९६ वर पोहचली आहे.

Web Title: Coronavirus News: One thousand 981 new infections and 37 deaths in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.