CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या वर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 21:15 IST2020-10-18T21:14:39+5:302020-10-18T21:15:09+5:30
CoronaVirus News : ठाणे शहरात २६६ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ४३ हजार ५७१ रुग्णांची नोंद झाली आहे.

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या वर!
ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी दोन लाख ४७० चा आकडा आजपर्यंत गाठला आहे. यात रविवारी सापडलेल्या एक हजार ८३ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासात २५ जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात आता पाच हजार ७० मृत्यूची संख्या झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाने दिली आहे.
ठाणे शहरात २६६ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ४३ हजार ५७१ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय, पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार १०४ झाली आहे. कल्याण - डोंबिवली परिसरात २९३ रुग्ण नव्याने आढळून आले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता ४७ हजार ८८८ रुग्ण बाधित असून आजपर्यंत ९५५ मृत्यू झाले आहेत.
उल्हासनगरला रविवारी २९ नवे रुग्ण आढळले आणि एकाचा मृत्यू झाला आहे. आता या शहरात आता नऊ हजार ८५५ रुग्ण बाधित असून मृत्यू संख्या ३२४ झाली आहे. भिवंडी मनपा. परिसरात ३६ रुग्ण नव्याने सापडले आहेत. मात्र आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. येथे पाच हजार ६६९ बाधीतांची तर, ३२८ मृतांची नोंद झाली आहे. मीरा भाईंदर शहरात ७९ नवे रुग्णं आणि चार मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. या शहरात आता २१ हजार २९१ बाधितांसह ६७१ मृतांची नोंद झाली आहे.
अंबरनाथ शहरात २६ रुग्णांचा नव्याने शोध लागला आहे. आज एकही मृत्यू झाला नाही. या शहरात आता सहा हजार ९९४ बाधितांसह २५८ मृतांची संख्या नोंदवण्यात आली आहे. बदलापूर परिसरामध्ये ४६ रुग्ण आज सापडले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण सहा हजार ९५६ झाले आहेत. आज एकही मृत्यू झालेला नसल्यामुळे मृत्यूची संख्या ९३ कायम आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये ६९ रुग्णांचा आज शोध लागला असून दोन मृत्यू झाले आहे. या गांवपाड्यांत आतापर्यंत १६ हजार ३४ बाधीत झाले असून ४८७ जणांचा मृत्यू झालेला आहे.