CoronaVirus News in Kalyan Dombivali : डोंबिवलीतील चोवीस तबलिगी गेले दिल्लीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 00:31 IST2020-05-19T00:30:42+5:302020-05-19T00:31:04+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : तबलिगींनी १२ मार्चनंतर दिल्ली सोडली होती. त्यानंतर ते ३१ मार्चदरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी गेले होते. कोरोनाची चाचणी केली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले.

CoronaVirus News in Kalyan Dombivali : डोंबिवलीतील चोवीस तबलिगी गेले दिल्लीला
डोंबिवली : धर्मप्रचारासाठी महिनाभरापूर्वी दिल्लीहून डोंबिवलीत आलेल्या २४ तबलिगींना आयसोलेशननंतर सोमवारी सायंकाळी शेलार नाका येथून बसमधून दिल्ली येथे रवाना करण्यात आले. तर, आणखी एका तबलिगी नागरिकाला मुंबईत पाठविल्याची माहिती केडीएमसीचे उपायुक्त सुनील जोशी यांनी दिली.
तबलिगींनी १२ मार्चनंतर दिल्ली सोडली होती. त्यानंतर ते ३१ मार्चदरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी गेले होते. कोरोनाची चाचणी केली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे खबरदारी म्हणून १ ते १४ एप्रिलदरम्यान भिवंडीतील टाटा अमंत्रा इमारतीत क्वारंटाइन केले होते. त्याची मुदत संपल्यानंतर त्यांना डोंबिवलीत १६ ते ३० एप्रिलपर्यंत डोंबिवलीत आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवले होते. अखेर, सोमवारी त्यांना विशेष बसने दिल्लीला पाठविण्यात आले. महापालिका आयुक्त, प्रशासन व पोलिसांनी घेतलेल्या काळजीमुळे त्यांनी सर्वांचे आभार मानले.