CoronaVirus News: ठाण्याच्या माजी महापौरांना कोरोनाची लागण 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 07:42 PM2020-07-04T19:42:12+5:302020-07-04T19:42:34+5:30

दोन दिवसांपूर्वी त्यांचा डायबेटीस वाढल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले होता.

CoronaVirus News: Former Thane mayor infected with corona | CoronaVirus News: ठाण्याच्या माजी महापौरांना कोरोनाची लागण 

CoronaVirus News: ठाण्याच्या माजी महापौरांना कोरोनाची लागण 

googlenewsNext

ठाणे: ठाणे महापालिकेच्या माजी महिला महापौरांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना ठाण्याच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी दुपारी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी त्यांचा डायबेटीस वाढल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले होता. त्यानंतर त्यांना ठाण्यातील एका नामवंत हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. या हॉस्पिटलमध्ये  एक दिवस ठेवल्यांनंतर त्यांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली. या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

डायबेटीसवर उपचार घेण्यासाठी ज्या हॉस्पिटलमध्ये दखल करण्यात आले होते ते हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल नसल्याने त्यांना दुसऱ्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.आपली प्रकृती पूर्णपणे स्थिर असून शुगर देखील कंट्रोलमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले,याशिवाय कोरोनाची कोणत्याही प्रकारची लक्षणे देखील आपल्याला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: CoronaVirus News: Former Thane mayor infected with corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.