शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

CoronaVirus News : लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 20:32 IST

CoronaVirus News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंबरनाथ आणि बदलापुरात लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

- पंकज पाटील 

अंबरनाथ : राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून दररोज हजारो कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. अशातच ही नवी लाट लहानग्यांसाठी जास्त धोकादायक असल्याचे समोर आले असून त्यामुळे समस्त पालकवर्गाची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंबरनाथ आणि बदलापुरात लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. (CoronaVirus News: Corona infection among children increases!)

कोरोनाची नव्याने आलेली लाट ही नव्या स्ट्रेनमुळे आल्याचे दावे केले जाता आहेत. कारण या नव्या कोरोनामध्ये जुन्या कोरोनाच्या लक्षणांसोबतच काही नवीन लक्षणं सुद्धा दिसून येत आहेत. ताप, थकवा, अशक्तपणा, खोकला या जुन्या लक्षणांसोबतच अतिसार किंवा जुलाब, उलट्या ही या नव्या कोरोनाची नवी लक्षणं आढळून येत आहेत. हीच लक्षणं लहान मुलांसाठी घातक ठरत आहेत. 

यापूर्वीही लहान मुलांना कोरोनाची लागण होत होती. मात्र लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार करण्याची क्षमता मोठ्यांपेक्षा जास्त असल्याने मुलं लवकर बरी होत होती. मात्र नव्या कोरोनामध्ये होत असलेले जुलाब, उलट्या हे त्रास लहान मुलांसाठी जीवघेणे ठरण्याची शक्यता आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या लहान मुलांची आकडेवारी पाहता बदलापूर शहरात मागील ३ महिन्यात ४०१ लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. 

यामध्ये शून्य ते पाच वयोगटातील ८८, सहा ते दहा वयोगटातील ९६, अकरा ते पंधरा वयोगटातील ११३, तर सोळा ते वीस वयोगटातील १०४ लहान मुलांचा समावेश आहे. तर अंबरनाथमध्येही मागील दोन महिन्यांत २१५ लहान मुलांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये शून्य ते पाच वयोगटातील २२, सहा ते दहा वयोगटातील ४४, अकरा ते पंधरा वयोगटातील ६२, सोळा ते वीस वयोगटातील ८७ लहान मुलांचा समावेश आहे. या नव्या आकडेवारीमुळे पालकांच्या चिंतेत भर पडणार असली, तरी मुलांची काटेकोरपणे काळजी घेणे ग हाच यावरील सर्वोत्तम उपाय असल्याचंही डॉक्टर सांगतात. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbadlapurबदलापूर