CoronaVirus News : अंबरनाथ पालिकेकडून ऑक्सिजनची मदत, बदलापूरमध्ये तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 12:15 AM2021-04-11T00:15:49+5:302021-04-11T00:16:20+5:30

CoronaVirus News: मानवतेचा दृष्टिकोन ठेवत अंबरनाथ नगरपालिकेने तत्काळ २५० लिटर क्षमतेचा सिलिंडर पाठवत रुग्णांवर ओढवणारे संकट क्षमविले.

CoronaVirus News: Ambernath Municipality provides oxygen, shortage in Badlapur | CoronaVirus News : अंबरनाथ पालिकेकडून ऑक्सिजनची मदत, बदलापूरमध्ये तुटवडा

CoronaVirus News : अंबरनाथ पालिकेकडून ऑक्सिजनची मदत, बदलापूरमध्ये तुटवडा

Next

बदलापूर : बदलापूर नगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या कोविड हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सकाळी ऑक्सिजनची गरज भासणार होती. मात्र ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला तत्काळ ऑक्सिजन पुरविणे शक्य नसल्याने बदलापूर पालिकेने अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे मदत मागितली. मानवतेचा दृष्टिकोन ठेवत अंबरनाथ नगरपालिकेने तत्काळ २५० लिटर क्षमतेचा सिलिंडर पाठवत रुग्णांवर ओढवणारे संकट क्षमविले.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या वतीने गौरी हॉल येथे २५० बेडचे कोविड रुग्णालय उभारले असून हे सर्व बेड ऑक्सिजन बेड असून त्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यासाठी पालिकेने एका कंत्राटदाराची नेमणूक केली असून, त्या कंत्राटदारामार्फत लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. गौरी हॉलसोबतच पालिकेने आता जान्हवी हॉलमध्येही कोविड रुग्णालय उभारले असून, त्याठिकाणीही ऑक्सिजन बेड तयार केले आहेत. त्या बेडसाठी गौरी हॉलमध्ये असलेले ऑक्सिजन जान्हवी लॉन येथे पाठविल्याने गौरी हॉलमधील रुग्णांना शुक्रवारी सकाळनंतर ऑक्सिजन कमी पडण्याची शक्यता होती. 
ही शक्यता लक्षात घेऊन पालिकेने लागलीच कंत्राटदाराला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सांगितले. मात्र अन्न व औषध प्रशासनामार्फत जे नवीन आदेश देण्यात आले आहे त्या आदेशाप्रमाणे प्रत्येक कंत्राटदाराला ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे बदलापूर पालिकेला किती ऑक्सिजनची गरज आहे हे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाला कळविल्या शिवाय ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य नव्हते. त्यामुळे कंत्राटदाराची ही समस्या लक्षात घेत पालिकेने तत्काळ आवश्यक असलेल्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याची मागणी केली. 

गौरी हॉलमधील रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून सुरक्षेचा उपाय करीत अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयातून २५० लिटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजनचा सिलिंडर मागविण्यात आला. अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात अतिरिक्त सिलिंडर असल्याने मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनीही मानवाचा दृष्टिकोन लक्षात घेत बदलापूर पालिकेला ही मदत केली.

कंत्राटदारामार्फत ऑक्सिजन येण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अंबरनाथ पालिकेकडून लिक्विड ऑक्सिजन मागविले होते. मात्र कंत्राटदाराकडून ऑक्सिजनचा पुरवठा आता सुरळीत झाला आहे.
    - दीपक पुजारी, मुख्याधिकारी,     बदलापूर

Web Title: CoronaVirus News: Ambernath Municipality provides oxygen, shortage in Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.