ठळक मुद्देजिल्ह्यात आता दोन लाख २८ हजार ५८८ रुग्णांची नोंद झाली.
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ७८९ रुग्ण रविवारी आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख २८ हजार ५८८ रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ६७७ नोंदल्या गेली आहे.
ठाणे शहरात १७६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या ५१ हजार १५५ नोंदली आहे. शहरात तीन मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्याही एक हजार २३१ झाली. कल्याण - डोंबिवलीत १९७ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू झाले आहे. आता ५३ हजार ९५७ रुग्ण बाधीत असून एक हजार ५९ मृत्यूची नोंंद झाली आहे.
उल्हासनगरमध्ये ४२ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या दहा हजार ८२१ झाली. तर, ३५३ मृतांची आहे. भिवंडीला ११ बधीत आढळून आले असून एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत सहा हजार २७४ असून मृतांची संख्या ३४५ आहे. मीरा भाईंदरमध्ये ४७ रुग्णांची तर, एकाही मृत्यूची नोंद नाही. या शहरात बाधितांची संख्या २४ हजार १३२ असून मृतांची संख्या ७५६ नोंदली आहे.
अंबरनाथमध्ये २१ रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. येथे बाधीत सात हजार ८५९ असून मृत्यू २८८ नोंदले आहे. बदलापूरमध्ये ४० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत आठ हजार ४४ झाले आहेत. या शहरात आजही मृत्यू न झाल्यामुळे मृत्यूची संख्या ९८ कायम आहे. ग्रामीणमध्ये ६८ रुग्णांची वाढ झाली असून एकाचाही मृत्यू नाही. आता बाधीत १८ हजार १६९ आणि आतापर्यंत ५६५ मृत्यू झाले आहेत.
Web Title: CoronaVirus News: 789 new corona patients and 8 deaths in Thane district
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.