CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे ७५८ नवे रुग्ण, तर ९ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 09:55 PM2020-11-28T21:55:37+5:302020-11-28T21:56:06+5:30

CoronaVirus News: ठाणे शहरात १९६ रुग्ण आढळून आले आहेत. यासह शहरात ५० हजार ९७९ रुग्णांची नोंद झाली आहे.

CoronaVirus News: 758 new corona patients and 9 deaths in Thane district during the day | CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे ७५८ नवे रुग्ण, तर ९ जणांचा मृत्यू 

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे ७५८ नवे रुग्ण, तर ९ जणांचा मृत्यू 

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ७५८ रुग्ण शनिवारी सापडले असून नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यात आता दोन लाख २७ हजार ७९९ रुग्ण संख्या झाली असून पाच हजार ६६९ मृत्यूची नोंद झालेली आहे. 

ठाणे शहरात १९६ रुग्ण आढळून आले आहेत. यासह शहरात ५० हजार ९७९ रुग्णांची नोंद झाले. तर, तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार २२८ झाली. कल्याण - डोंबिवलीत २०३ रुग्ण आढळून आले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता ५३ हजार ७६० बाधित असून एक हजार ५७ मृत्यू झाले आहेत.

उल्हासनगरमध्ये २६ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. आता या शहरात दहा हजार ७७९ बाधीत नोंदले असून मृत्यू संख्या ३५३ नोंदली आहे. भिवंडी परिसरात १३ रुग्णं सापडले आहेत. तर, मृत्यू आज शुन्य आहे. येथे पाच हजार २६३ बाधितांची तर, ३४५ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदर शहरात ७३ रुग्ण सापडले मात्र एकही मृत्यू नाही. या शहरात २४  हजार ८५ बाधितांस ७५६ मृतांची संख्या झालेली आहे. 

अंबरनाथ शहरात १७ रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता सात हजार ८३८ बाधितांसह मृतांची संख्या २८८ नोंदवण्यात आली आहे. बदलापूरला ४१ रुग्ण आज सापडल्याने आठ हजार चार बाधित नोंदले गेले आहे. येथे एकही मृत्यू न झाल्याने मृत्यूची संख्या ९८ आहे. जिल्ह्यातील गावपाड्यांमध्ये ४६ रुग्णांचा शोध लागला असून मृत्यू नाही. या गांवपाड्यांत आतापर्यंत १८ हजार १०१ बाधित झाले असून ५६५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Web Title: CoronaVirus News: 758 new corona patients and 9 deaths in Thane district during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.