Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात दिवसभरात ४७७ नविन रुग्णांची भर: १४ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 21:59 IST2020-06-07T21:56:34+5:302020-06-07T21:59:22+5:30
ठाणे महापालिका क्षेत्रात ७ जून रोजी १३८ कोरोना बाधीतांसह तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांचा आकडा चार हजार ५७ तर, मृतांचा आकडा ११६ वर पोहोचला. जिल्ह्यातील बाधितांचा संख्या ११ हजार ३५९ च्या घरात गेली असून रविवारी दिवसभरात १४ जणांचा मृत्यु झाला आहे.

ठाणे शहरात १३८ नविन रुग्णांची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेने रविवारी कोरोनाबाधितांनी शंभरी पार केली. त्यामुळे जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ४७७ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. दरम्यान १४ रु ग्णांचा मृत्यु झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ११ हजार ३५९ तर, मृतांचा आकडा ३६६ इतका झाला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात ७ जून रोजी १३८ कोरोना बाधीतांसह तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांचा आकडा चार हजार ५७ तर, मृतांचा आकडा ११६ वर पोहोचला. त्यापाठोपाठ नवी मुंबई महापालिकेत ११५ रु ग्णांची नोंद झाली. याठिकाणी एकाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधीतांचा आकडा दोन हजार ८८६ तर, मृतांची संख्या ८९ वर पोहोचली आहे. कल्याण डोंबिवलीत २९ रु ग्णांची नोंद झाली असून त्याठिकाणी दोघांचा मृत्यू झाला. याठिकाणी एक हजार ४१८ कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा ४० झाला. तर मीरा भार्इंदरमध्ये ३४ नविन रु ग्णांच्या नोंदीसह चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ९८३ तर, मृतांची संख्या ५५ वर गेली आहे. भिवंडीमध्ये १८ रु ग्णांच्या नोंदीसह एकाच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची २६१ तर, मृतांची संख्या १६ वर गेली. उल्हानगरमध्ये ८३ रु ग्णांची नोंद झाली. तर तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याठिकाणी बाधितांची संख्या ५७९ तर मृतांची संख्या २३ वर गेली आहे. बदलापूरमध्ये १७ रु ग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ३०९ झाली. अंबरनाथमध्ये ३३ रु ग्णांची नोंद झाली असून बाधितांची संख्या ३५६ वर गेली आहे. ठाणे ग्रामीण भागात १० रु ग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ५०२ इतकी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.