Coronavirus News: 47 death and 1876 new patient of corona in Thane district on Sunday | Coronavirus News: ठाणे जिल्हयात रविवारी दिवसभरात एक हजार ८७६ बाधितांसह ४७ जणांचा मृत्यू

जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४२ हजार ४१८

ठळक मुद्देकोरोनाचा कहर सुरुचजिल्ह्यातील बाधितांची संख्या ४२ हजार ४१८मृतांची संख्या एक हजार २५२

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रु ग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात रविवारी दिवसभरात बाधितांची संख्या एक हजार ८७६ तर ४७ जणांचा मृत्यु झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४२ हजार ४१८ तर मृतांची एक हजार २५२ इतकी झाली आहे.
शनिवारप्रमाणे रविवारी देखिल कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक ४८२ रु ग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची नऊ हजार ८६ तर मृतांची संख्या १४० च्या घरात पोहचली आहे. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातही रविवारी ३७३ नविन रुग्णांची नोंद झाली. तर १६ जणांचा मृत्यू ओढवला. त्यामुळे बाधितांची संख्या दहा हजार ७३१ तर मृतांची संख्या ४०२ इतकी झाली. नवी मुंबई महापालिकेत १९१ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या आठ हजार ५० तर मृतांची संख्या २४४ वर पोहोचली. मीरा भार्इंदरमध्ये ३०३ नव्या रुग्णांची भर पडली असून चौघांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या चार हजार ३१४ तर मृतांची संख्या १६२ इतकी झाली.
भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रातही ६९ जण बाधित झाले. तर एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार ३१९ तर मृतांची संख्या १२० इतकी झाली आहे. उल्हासनगरमध्ये २५१ नविन रुग्णांची भर पडली. तर एकाचा मृत्यू झाल्याने दोन हजार ८१० बाधितांची तर मृतांची संख्या ५३ इतकी झाली. अंबरनाथमध्ये नव्याने ७४ जण बाधित झाले असून १२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे बाधितांची दोन हजार १९६ तर मृतांची संख्या ७० वर पोहचली आहे. बदलापूरमध्ये २१ रु ग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ९७३ इतकी झाली. तर ठाणे ग्रामीण भागात नव्याने ११२ रु ग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार १९२ तर मृतांची संख्या ६१ वर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Coronavirus News: 47 death and 1876 new patient of corona in Thane district on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.