CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात २७ कोरोना रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 03:36 IST2020-06-21T03:36:36+5:302020-06-21T03:36:51+5:30

तसेच दिवसभरात जिल्ह्यात २७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

CoronaVirus News : 27 corona patients die in Thane district | CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात २७ कोरोना रुग्णांचा मृत्यू

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात २७ कोरोना रुग्णांचा मृत्यू

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी १०४६ नवे रुग्ण सापडल्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. तसेच दिवसभरात जिल्ह्यात २७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा २०,५६६ तर, मृतांची संख्या ६८४ झाली आहे. कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात शनिवारी सर्वाधिक २४३ रुग्णांसह दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. येथील बाधितांची संख्या ३,२५८, तर मृतांची संख्या ७१ झाली. ठाणे महापालिका हद्दीत १७६ नवे रुग्ण सापडले, तर सहा जणांचा मृत्यू झाला. येथील एकूण बाधितांची संख्या ६,१३२ तर, मृतांची संख्या १९८ वर गेली आहे. नवी मुंबईत १७२ रुग्णांची, तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या चार हजार ६८७, तर मृतांची संख्या १५७ वर पोहोचली. भिवंडी पालिका क्षेत्रात ८१ नव्या बाधितांसह दोन जणांचा मृत्यू झाला. येथील एकूण बाधित संख्या ८७५ तर, मृतांची संख्या ६६ झाली आहे. तर मीरा-भार्इंदरमध्ये १३६ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या क्षेत्रात २,१५२ एकूण बाधित, तर मृतांची संख्या १०३ झाली.
उल्हासनगरमध्ये ५५ रुग्णांची नोंद झाली. तर एकाचा मृत्यू झाला. येथील एकूण बाधित संख्या एक हजार ५ तर, मृतांची संख्या ३० झाली आहे. अंबरनाथमध्ये १३१ रुग्णांची, तर एकाच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या १,१२०, तर मृतांची संख्या २४ झाली आहे. बदलापूरमध्ये २६ रुग्णांची नोंद केल्याने बाधितांची संख्या ५२७ झाली आहे.
>ग्रामीण भागातही वाढ
ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे. ठाणे ग्रामीण भागात शनिवारी २६ नवे रुग्ण सापडले. तर एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८१०, तर २४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: CoronaVirus News : 27 corona patients die in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.