CoronaVirus News: 228 new corona patients die in Thane district | CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे नवे २२८ रुग्ण, दोघांचा मृत्यू 

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे नवे २२८ रुग्ण, दोघांचा मृत्यू 

ठळक मुद्देठाणे जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांत ३९ रुग्णांची वाढ असून एकही मृत्यू  नाही.

ठाणे : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात २२८ रुग्ण आढळले आहेत. आता जिल्ह्यात दोन लाख ४९ हजार ७३५ बाधित रुग्ण झाले आहेत. तर, आज फक्त दोन रुग्णांच्या मृत्यूने जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ५७ झाली आहे.  

ठाणे परिसरात ५७ रुग्ण सापडले आहेत. या शहरात ५७ हजार ४०० रुग्णांची नोंद झाली. एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३४१ झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत ५५ रुग्णांची वाढ झाली असून मृत्यू नाही. आता येथे ५९ हजार २१६ बाधीत असून एक हजार ११९ मृतांची नोंद आहे. 

उल्हासनगरात नऊ नवे रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. या शहरात ११ हजार ५२९ रुग्ण संख्या आहे. तर मृतांची संख्या ३६४ आहे. भिवंडीत एक बाधित आढळला असून आता या शहरात बाधित सहा हजार ६६६ झाले आहेत. आज एकही मृत्यू नसून मृतांची संख्या ३५२ कायम आहे. मीरा भाईंदरमध्येत १० रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधित २६ हजार १४ झाले, तर, मृत्यू ७९३ नोंदले आहेत. 

अंबरनाथमध्ये सात रुग्ण नव्याने वाढले असून एक मृत्यू आहे. या शहरात बाधितांची संख्या आठ हजार ४७४ झाली असून मृतांची संख्या ३१० झाली. बदलापूरमध्ये १३ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या नऊ हजार १६५ झाली आहे. या शहरात मृत्यू नसून मृतांची संख्या १२० कायम आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांत ३९ रुग्णांची वाढ असून एकही मृत्यू  नाही. आता १९ हजार ३४ बाधितांसह ५८३ मृतांची नोंद झाली आहे.
 

Web Title: CoronaVirus News: 228 new corona patients die in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.