CoronaVirus News: 1700 corona patients in Thane district; 35 killed | CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १७०० रुग्ण; ३५ जणांचा मृत्यू

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १७०० रुग्ण; ३५ जणांचा मृत्यू

ठाणे : जिल्ह्यातील बाधित रु ग्णांच्या संख्येत रविवारपेक्षा सोमवारी काही अंशी कमी नोंद झाल्याचे आढळले आहे. सोमवारी जिल्ह्यात एक हजार ७०० रुग्ण नोंद झाले, तर कोरोनामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५७ हजार चार तर मृतांची संख्या एक हजार ६५१ इतकी झाली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात १३ जुलै रोजीदेखील सर्वाधिक ४२७ रुग्णांसह नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे या ठिकाणी १३ हजार २४० इतकी बाधितांची तर १९८ मृतांची संख्या झाली आहे. त्यापाठोपाठ ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ३३३ बाधितांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे या ठिकाणी बाधितांची संख्या १३ हजार ६७५ तर मृतांची ५१५ वर पोहोचली आहे. नवी मुंबई महापालिकेत २३३ नवे रुग्ण दाखल झाले, तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या नऊ हजार ६७८ तर मृतांची ३०५ वर पोहोचली आहे.
मीरा-भार्इंदरमध्ये सोमवारी १७८ नव्या रुग्णांची तर आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ७४६ तर मृतांची १९९ वर पोहोचली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात ४२ बाधितांची तर एकाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे भिवंडीत बाधितांची संख्या दोन हजार ८२४ तर मृतांची १४७ वर पोहोचली. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातही २२५ रु ग्ण नव्याने दाखल झाले असून चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या चार हजार ४२५ तर, मृतांची संख्या ७१ वर पोहोचली आहे.
अंबरनाथमध्ये ५१ रु ग्णांची नोंद झाल्यामुळे या ठिकाणी बाधितांची संख्या दोन हजार ७२५ झाली. तर बदलापूरमध्ये ८४ रु ग्ण नव्याने दाखल झाले. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजार ४७७ झाली. तसेच ठाणे ग्रामीण भागात १२७ रु ग्णांची तर चौघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या तीन हजार २१४ तर मृतांची संख्या ८१ वर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: CoronaVirus News: 1700 corona patients in Thane district; 35 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.