coronavirus: MP Kapil Patil infected with coronavirus | coronavirus: खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण

coronavirus: खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण

भिवंडी : भिवंडीचे भाजप खासदार कपिल पाटील यांना व त्यांच्या कुटुंबातील सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
खासदार पाटील हे पत्नी, मुलगा, मुलगी व तीन पुतण्यांसह राहतात. पाटील यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्या घरातील सर्वांची स्वॅब चाचणी केली असता खासदार, मुलगा, मुलगी, सून व त्यासोबतच एक पुतण्या व दोन सुना असे आठ जण कोरोनाबाधित आढळले. या सर्वांवर उपचार सुरू असून पाटील यांना सौम्य लक्षणे असल्याने ते होम क्वारंटाइन आहेत. सर्वांची प्रकृती ठीक आहे. काळजीचे कारण नसल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. सर्वांच्या सदिच्छांच्या बळावर पुन्हा नव्या जोमाने कार्यरत होण्याचे बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: coronavirus: MP Kapil Patil infected with coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.