Coronavirus: मीरा भाईंदर महापालिकेच्या वैद्यकीय विभागात मेगा भरती; २० जूनपर्यंत भरा अर्ज  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 09:22 PM2020-06-16T21:22:17+5:302020-06-16T21:22:47+5:30

पालिकेच्या 819 पदासांसाठी 20 जून पर्यंत अर्ज करता येणार 

Coronavirus: Mega recruitment in the medical department of Mira Bhayander Municipal Corporation | Coronavirus: मीरा भाईंदर महापालिकेच्या वैद्यकीय विभागात मेगा भरती; २० जूनपर्यंत भरा अर्ज  

Coronavirus: मीरा भाईंदर महापालिकेच्या वैद्यकीय विभागात मेगा भरती; २० जूनपर्यंत भरा अर्ज  

googlenewsNext

मीरारोड - कोरोना विरोधातील लढया साठी मीरा भाईंदर महापालिकेने मानधनावर मेगा भरती काढली आहे . वैद्यकीय सेवेच्या 819 पदांसाठी भरती सुरु केली असून इच्छुकांना २० जून सायंकाळ पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे . पदांप्रमाणे 25 हजार पासून 2 लाख पर्यंत दरमहा मानधन दिले जाणार आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग व होणारे मृत्यूचे प्रमाण पाहता शहरात आणखी तात्पुरत्या रुग्णालयांची निर्मिती होणे अत्यावश्यक आहे . कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता पालिकेच्या कोरोना रुग्णालय , कोविड केअर आणि अलगीकरण केंद्रात तसेच आरोग्य केंद्रावर ताण वाढला आहे. पालिकेच्या मीरारोड येथील रुग्णालय व प्रसूतिगृहात सुद्धा कर्मचाऱ्यांची वानवा आहे. काहींना कोरोनाची  लागण झालेली आहे.

आधीच वैद्यकीय सेवेतील कर्मचारी अपुरे असताना कोरोना मुळे आणखी कर्मचाऱ्यांची गरज असल्याने पालिका आयुक्तांनी ठोकमनधनावर हि मेगा भरती सुरु केली आहे .  6 भीषक, 14 भीषक ऑन कॉल, 6 भूलतज्ञ, 87 एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, 89 आयुष वैद्यकीय अधिकारी, 9 रुग्णालय व्यवस्थापक, 492 परिचारिका, 40 प्रसविका, 8 क्ष-किरण तंत्रज्ञ, 8 ईसीजी तंत्रज्ञ व 28 प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि 32 औषध निर्माता अशी पदे भरली जाणार आहे. 

वैद्यकीय विभागाच्या मानधनावरील भरतीप्रक्रियेमुळे शहरात कोरोना रुग्णांवर लवकर उपचार होऊन बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच अन्य आजारांवर देखील वेळीच उपचार करणे शक्य होईल अशी आशा आहे. तर इतक्या मोठ्या संख्येने ठोकमनधनावर भरती काढली असली तरी यात देखील वशिलेबाजीसाठी काही राजकीय व प्रशासकीय हस्तक्षेप निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

Web Title: Coronavirus: Mega recruitment in the medical department of Mira Bhayander Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.