Coronavirus : श्री सदस्यांची बैठक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 00:25 IST2020-03-17T00:25:14+5:302020-03-17T00:25:32+5:30
ठाणे जिल्ह्यासह अंबरनाथ तालुक्यातही हजारोंच्या संख्येने श्री सदस्य आहेत. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानशी संबंधित आणि त्यांच्या विचारांचा आदर करणारे हे श्री सदस्य दरआठवड्याला उपासना केंद्रात बैठकीसाठी येतात.

Coronavirus : श्री सदस्यांची बैठक बंद
अंबरनाथ - अंबरनाथ आणि बदलापुरात नानासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी मोठ्या संख्येने असून या श्री सदस्यांची आठवड्याची बैठक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरआठवड्याला नियमित बैठक होत असल्याने या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यासह अंबरनाथ तालुक्यातही हजारोंच्या संख्येने श्री सदस्य आहेत. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानशी संबंधित आणि त्यांच्या विचारांचा आदर करणारे हे श्री सदस्य दरआठवड्याला उपासना केंद्रात बैठकीसाठी येतात. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक न चुकता घेतली जाते. एकाच ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याने आता बैठक रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशाची अंमलबजावणी प्रत्येक केंद्र घेत आहे. अंबरनाथ तालुक्यातील सर्व बैठक केंद्रे बंद करण्यात आली असून त्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.