शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

CoronaVirus News: 'ती' चूक तुम्ही करू नका, मोठी किंमत मोजावी लागेल; आव्हाडांचं जनतेला कळकळीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 11:54 IST

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपचार घेऊन घरी परतले

ठाणे: राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना काल मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. २३ एप्रिलपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुढील काही दिवस आव्हाड डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच थांबतील. आव्हाड यांनीच ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.मी सुरुवातीला कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं. मात्र सुदैवानं मी यामधून वाचलो, असं आव्हाड म्हणाले. 'सुरुवातीला माझी चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे मी परिस्थिती गांभीर्यानं घेतली नाही,' असं आव्हाड यांनी सांगितलं. 'त्यानंतर मला ताप आला. माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्यानं ही लक्षणंदेखील दूर होतील, असं मला वाटलं. ती माझी चूक होती. त्याची मोठी किंमत मला मोजावी लागली,' असं आव्हाड म्हणाले. लोकांनी कोरोनाच्या लक्षणांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं, लक्षणं दिसल्यास ती गांभीर्यानं घ्यावीत, असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं. 'कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यास नागरिकांनी प्रशासनाला सतर्क करावं. तातडीनं डॉक्टरांकडे जावं. तुम्ही लक्षणांकडे दुर्लक्ष केलं, उपचारांना उशीर केला, तर त्याची जबर किंमत तुम्हाला मोजावी लागेल,' असं आव्हाड पुढे म्हणाले. सुरुवातीला आव्हाड यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुंब्रा परिसरात अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम सुरू ठेवला. 'मला काहीही होणार नाही, असं मला वाटलं. मी लोकांमध्ये जाऊन जेवणाची पार्सल्स वाटत होतो. मी तसं करायला नको होतं,' असं आव्हाड म्हणाले. रुग्णालयातून घरी परतलेल्या आव्हाडांनी त्यांची काळजी घेणाऱ्या सर्वांचेच आभार मानले....म्हणून जवान मोठ्या संख्येनं सोडताहेत हवाई दल; सर्वेक्षणातून चिंताजनक माहिती समोर 

गिलगिट-बाल्टिस्‍तानवर भारताच्या 'मास्‍टरस्‍ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावाड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड