शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

coronavirus: कोविड सेंटरसह खाजगी रुग्णालयांतही बेडची कमतरता, रुग्णांचे हालच हाल, अपुऱ्या मनुष्यबळावर पडतोय ताण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 00:13 IST

बेड शिल्लक असल्याचे महापालिकेच्या वेबसाइटवर दिसत आहे. परंतु, प्रत्यक्षात रुग्णालयांकडे विचारणा केल्यावर बेडच शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे.

ठाणे : वाढती संख्या लक्षात घेता कोरोना रुग्णांना आता रुग्णालयात बेड मिळणे मुश्कील झाले आहे. शहरातील विविध कोविड रुग्णालयांत आयसीयूचे आठ तर नॉन-आयसीयूचे १८४ बेड शिल्लक असल्याचे महापालिकेच्या वेबसाइटवर दिसत आहे. परंतु, प्रत्यक्षात रुग्णालयांकडे विचारणा केल्यावर बेडच शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. साधे बेड शिल्लक असल्याचे दिसत असले, तरी रुग्णाला अ‍ॅडमिट करण्यासाठी मेडिक्लेमची विचारणा केली जात आहे.ठाण्यात आजघडीला १७ कोविड हॉस्पिटले आहेत. भार्इंदरपाडा येथे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवले जात आहे, तर चार हॉटेलसह एक शाळा आणि कौसा स्टेडिअममध्येही याच रुग्णांसाठी व्यवस्था केली आहे. यातील तीन हॉटेल फुल्ल असून एका हॉटेलमध्ये ५० बेड शिल्लक आहेत. तसेच कौसा स्टेडिअममध्ये १४४, होरायझन स्कूलमध्ये ९१८ आणि भार्इंदरपाडा येथे पाच बेड शिल्लक आहेत. परंतु, ज्या रुग्णांची प्रकृती खालावत जात आहे, त्यांच्यासाठी आवश्यक असलेले आयसीयूचे आठच बेड शिल्लक आहेत. १७ रुग्णालये असतानाही आता केवळ वेबसाइटवर आठच बेड शिल्लक असल्याचे दिसत आहे.प्रत्यक्षात मात्र एकही बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. तर, नॉन आयसीयूचे १८४ बेड सध्याच्या घडीला शिल्लक असल्याचे वेबसाइटवर दाखविले आहे. परंतु, एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला तर त्याला प्रशासनाच्या अडथळ्यांच्या साखळीतून पुढे जावे लागत आहे.संबंधित मेडिकल आॅफिसरशी आधी बोला, जेव्हा वेळ असेल तेव्हा अ‍ॅम्ब्युलन्स आणि त्यानंतर हॉस्पिटल उपलब्ध करून दिले जात असून यात एक दिवस जात आहे. यामुळे रुग्णाचे हाल तर होतातच परंतु या सगळ्या प्रक्रियेमुळे त्यांचे नातेवाईकही हैराण होत आहेत.मेडिक्लेमशिवाय अ‍ॅडमिट नाही : एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून जर खाजगी रुग्णालयात बेडची व्यवस्था झालीच, तर आधी मेडिक्लेमशिवाय बेड दिला जात नाही. यामुळे ज्यांच्याकडे मेडिक्लेम नसेल, त्या रुग्णांनी काय करायचे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.१०२४ बेडसाठी २०० कर्मचारी : महापालिकेने शहरात १०२४ बेडचे कोविड केअर सेंटर उभारले असून तेथील २५ बेड आयसीयू असून सध्या भरलेले असल्याने इतर रुग्ण वेटिंगवर आहेत. येथे २०० मनुष्यबळ असून दाखल झालेल्यांची संख्या ७०० च्या आसपास आहे. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळावर ताण पडत आहे.महापालिकेच्या वेबसाइटवर ४९९ बेड्स शिल्लक असून यामध्ये ७६ बेड हे आयसीयूचे तर नॉन आयसीयूचे ४२३ दाखविले जात आहे. परंतु, आयसीयूचा कारभार सांभाळण्यासाठी मनुष्यबळच नसल्याने नव्याने येणाºया रुग्णांना वेटिंगवर ठेवले जाते. शिल्लक ४२३ बेड फुल्ल झाल्यास अपुºया मनुष्यबळावर ताण पडणार असल्याने महापालिकेने पुन्हा भरतीची जाहिरात काढली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे