Coronavirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 6 नवे रुग्ण; कोरोना बाधितांची एकूण संख्या 49वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 04:51 PM2020-04-10T16:51:44+5:302020-04-10T16:52:06+5:30

महापालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला असल्याने कल्याण डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहे.

Coronavirus : Kalyan-Dombivali Corona 6 new patients | Coronavirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 6 नवे रुग्ण; कोरोना बाधितांची एकूण संख्या 49वर

Coronavirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 6 नवे रुग्ण; कोरोना बाधितांची एकूण संख्या 49वर

Next

कल्याण-कल्याण डोंबिवलीत आज कोरानाचे 6 नवे रुग्ण आढळून आले आहेत.  त्यामुळे महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 49 झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये पाच वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला असल्याने कल्याण डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहे. त्यातही डोंबिवली पूर्वेला कोरोनाने जास्त जणांना लक्ष्य केले आहे. डोंबिवली पूव्रेत आत्तार्पयत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 25 झाली आहे.
नवे रुग्ण वाढत असल्याने त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे ही बाब  प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेची ठरली आहे. दर दिवशी नवे रुग्ण आढळून येत आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून आखण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचे काही नागरीकांकडून उल्लंघन होत असल्यानेच हा आकडा वाढतो असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
नव्याने आढळून आलेल्या सहा रुग्णापैकी पाच रुग्ण हे डोंबिवली पूव्रेतील आहे. त्यात पाच वर्षाचा मुलगा व तीन महिला आणि एक तरुणाचा समावेश आहे.याशिवाय कल्याण पूव्रेतील 50 वर्षीय गृहस्थाला कोरोना झाला आहे. यापूर्वी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांपैकी आठ जणांना उपचाराअंती घरी सोडण्यात आली आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आजमितीस 38 आहे. आत्तार्पयत कोरोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांपैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विभागानुसार रुग्णांची संख्या विचारात घेता डोंबिवली पूर्वेला कोरोनाने जास्त जणांना लक्ष्य केले आहे.
महापालिकेने कल्याण डोंबिवली शहरात खाजगी वाहनांना बंदी केली आहे. किराणा मालाची दुकाने, डेअरी, खाद्य पदार्थ यांची दुकाने सकाळी पाच ते दुपारी 2 र्पयत सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीने घाऊक बाजार सुरु ठेवला आहे. तसेच फळबाजार, भाजीपाला, अन्नधान्य शेतमाल हा सगळा इतत्र विभागला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने ड्रोन कॅमेरे लावले आहे. रुग्ण आढळलेले विभाग पोलिसानी सील केले आहे. गर्दीवरील नियंत्रण व सोशल डिस्टसिंग पाळले जात नाही. घरात बसाचा नियम पाळता जात नसल्याने रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
चौकट-विभागनुसार रुग्ण संख्या
कल्याण पूर्व-9
कल्याण पश्चिम-7
डोंबिवली पूर्व-25
डोंबिवली पश्चिम-7
टिटवाळा-1
-------------
एकूण-49

Web Title: Coronavirus : Kalyan-Dombivali Corona 6 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.