शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

coronavirus: सात महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष; विद्या प्रसारक मंडळाची उच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 05:11 IST

ठाणे महानगरपालिकेने नोटीस न देताच सात महाविद्यालयांच्या इमारती ताब्यात घेतल्याने कोंडीत अडकलेल्या ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर न्यायालयाने ठाणे पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : एकीकडे मुंबई विद्यापीठाने एफवाय व एसवायच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून निकाल लावण्याचे आदेश दिले असताना दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेने नोटीस न देताच सात महाविद्यालयांच्या इमारती ताब्यात घेतल्याने कोंडीत अडकलेल्या ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर न्यायालयाने ठाणे पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.मुंबई विद्यापीठाने २५ मे २०२० रोजी परिपत्रक काढून सर्व महाविद्यालयांना पेपर तपासून निकाल लावण्याचे आदेश दिले. राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्व खबरदारीचे उपाय आखून पेपर तपासण्याची प्रक्रिया सुरू असताना ठाणे पालिकेने कोणतीही नोटीस न देता ८ जून रोजी विद्या प्रसारक मंडळाचे के. जी. जोशी महाविद्यालय, एन. जी. बेडेकर, बी. एन. बांदोडकर, टीएमसी विधि महाविद्यालय, पॉलिटेक्निक आणि डॉ. व्ही. एन. बेडेकर इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज् आणि कॅन्टीनची इमारत विलगीकरण केंद्र असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ९ जून रोजी ठाणे पालिकेचे १०-१५ अधिकारी पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन महाविद्यालयाच्या आवारात धडकले. सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांचा निकालाचा प्रश्न असल्याने ठाणे पालिकेचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय बेडेकर यांनी अ‍ॅड. नितीन प्रधान यांच्याद्वारे उच्च न्यायालयात दाखल केली आहे. पूर्व नोटीस न देता पोलिसांच्या उपस्थितीत सात महाविद्यालयांच्या इमारती ताब्यात घेण्याचा पालिकेचा निर्णय बेकायदेशीर ठरवावा आणि रद्दबातल करावा, अशी विनंती याचिकादारांनी केली आहे.‘पेपर तपासण्याचे काम सुरू असताना संबंधित महाविद्यालयांच्या इमारती ताब्यात घेऊन त्यांचे विलगीकरण कक्षात रूपांतर करणे योग्य आहे का? याचिकाकर्ते चालवत असलेली महाविद्यालये लॉकडाऊनमुळे तात्पुरती बंद आहेत. त्यांना कायमचे टाळे लावण्यात आले नाही. लॉकडाऊन काढल्यावर लगेच महाविद्यालये सुरू करण्यात येतील,’ असे याचिकेत म्हटले आहे.मार्गदर्शक तत्त्वांचा पडला विसरमहाराष्ट्र कोविड - १९ अधिनियम, २०२० नुसार, राज्य सरकारने विलगीकरण केंद्रासाठी सरकारी किंवा खासगी इमारत ताब्यात घेण्याची परवानगी दिली आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विलगीकरण केंद्रे गजबजलेल्या ठिकाणी नसावीत. शहराच्या किंवा गावाबाहेर असावीत. मात्र, या सातही महाविद्यालयांच्या इमारती गजबजलेल्या ठिकाणी आहेत. आजूबाजूला रहिवासी इमारती असून नागरिकांचा जीव धोक्यात घालण्यात येत आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेEducation Sectorशिक्षण क्षेत्रMumbai High Courtमुंबई हायकोर्ट