coronavirus: ठाणे जिल्ह्यात ५२१ कोरोना रुग्णांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 23:25 IST2020-12-06T23:25:12+5:302020-12-06T23:25:43+5:30
Thane coronavirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र असले तरी शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी रुग्ण आढळले. रविवारी ठाणे जिल्ह्यात ५२१ रुग्णांची तर ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

coronavirus: ठाणे जिल्ह्यात ५२१ कोरोना रुग्णांची वाढ
ठाणे - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र असले तरी शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी रुग्ण आढळले. रविवारी ठाणे जिल्ह्यात ५२१ रुग्णांची तर ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या दोन लाख ३२ हजार ९२२ तर पाच हजार ७४४ इतकी मृतांची संख्या झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिका क्षेत्रात १२९ बाधितांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ५२ हजार ५८९ तसेच एक हजार २५२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. नवी मुंबईमध्ये ११६ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे या ठिकाणी ४९ हजार १२ रुग्णांची तर ९९८ मृतांची आतापर्यंत नोंद झाली. कल्याण-डोंबिवलीत नव्याने १२१ रुग्णांसह दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे ५४ हजार ८७४ बाधितांची तर एक हजार ६९ मृतांची नोंद झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये ४९ रुग्णांसह एकाच्या मृत्यूची नोंद झाली.
भिवंडी महापालिका क्षेत्रात तीन रुग्ण नव्याने बाधित झाले. तसेच उल्हासनगरमध्ये ३३ रुग्णांची तर एकाच्या मृत्यूची नोंद झाली. अंबरनाथमध्येही १० रुग्णांसह एकाच्या मृत्यूची नोंद झाली. बदलापूरमध्ये ४० रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर ठाणे ग्रामीण भागात २० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या १८ हजार ३०८ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.