शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

coronavirus: आयसीयूचे २४ बेडच कार्यान्वित, ग्लोबल हॉस्पिटलसंदर्भात आयुक्तांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 1:33 AM

‘ग्लोबल’च्या तीन आयसीयूमध्ये डॉक्टर होते. मात्र, एकाची तब्येत बिघडल्यामुळे ते गेले. तर, अन्य एकाला कोरोना झाला. त्यामुळे क्वारंटाइन होणे आवश्यक असल्याने तेथे डॉक्टरची कमतरता असल्याचे ते म्हणाले.

ठाणे : ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ७४ बेडचे आयसीयू युनिट असून, यामध्ये केवळ २४ बेडच कार्यान्वित असल्याची कबुली ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी गुरुवारी दिली. विशेष म्हणजे या २४ बेडसाठी एकच डॉक्टर असून भरती प्रक्रियादेखील निरंतर सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.‘ग्लोबल’च्या तीन आयसीयूमध्ये डॉक्टर होते. मात्र, एकाची तब्येत बिघडल्यामुळे ते गेले. तर, अन्य एकाला कोरोना झाला. त्यामुळे क्वारंटाइन होणे आवश्यक असल्याने तेथे डॉक्टरची कमतरता असल्याचे ते म्हणाले. २४ बेडसाठी एकच डॉक्टर असून भरती प्रक्रि या ही एकदा झाली असली तरी ती पुन्हा होणार आहे.रु ग्णांच्या होणार तीन प्रकारच्या नोंदीग्लोबल हॉस्पिटलसारखा प्रकार यापुढे न होण्यासाठी रु ग्णाला दाखल करतानाच आता तीन प्रकारच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. आधारकार्ड आणि पॅनकार्ड घेऊन त्याची नोंद केली जाईल. त्यानंतर रु ग्णाचे छायाचित्र घेऊन तेही त्याच्या फाइलला लावले जाणार आहे. तसेच रुग्णांच्या नातेवाइकांनाही विश्वासात घेतले जाणार आहे.केडीएमसी हद्दीत कोरोनाचे ५८० रुग्णकल्याण : केडीएमसी हद्दीत गुरुवारी कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १६४ झाली आहे. दुसरीकडे नवीन ५८० रुग्ण आढळले असून, ही मनपा हद्दीतील आजवरची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १० हजार ९३१ झाली आहे. तर, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या पाच हजार २१९ आहे. दरम्यान, दिवसभरात ६०२ रुग्णांना डिस्चार्ज दिल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्या पाच हजार ५४८ आहे.‘त्या’ दोन्ही कुटुंबांना मिळणार योग्य मृत्यू दाखलागायकवाड आणि सोनावणे यांच्या अदलाबदल प्रकरणात आपण वैयक्तिक लक्ष घातले असून दोन्ही कुटुंबीयांना योग्य मृत्यूचा दाखला दिला जाणार आहे. तशी कार्यवाही सुरू केल्याचेही शर्मा यांनी सांगितले.शहापूरमध्ये २८ रुग्ण सापडलेशहापूर : तालुक्यात गुरुवारी एकाच दिवशी २८ रुग्ण सापडले. शहापूर नगरपंचायत क्षेत्रात पाच तर शहापूर ग्रामीण क्षेत्रात २३ रुग्ण सापडले. आतापर्यंत तालुक्यात एकूण ३८३ कोरोनाबधितांची संख्या झाली आहे. आतापर्यंत एकूण १३ जणांचा मृत्यू झाला असून २२४ जण बरे झाले आहेत. एकूण १४६ जणांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आला आहे. तरीही रु ग्णांची संख्या वाढत आहे. येथील कोविड रुग्णालयही भरले असल्याने नव्या रु ग्णांना दाखल करून घेण्यास प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.कोरोना रुग्ण वेटिंगवरउल्हासनगर : शहरात बेड नसल्याने कोरोना रुग्णांना वेटिंगवर राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांची हेळसांड होत आहे. तसेच रुग्णांच्या संपर्कातील कुटुंबे आणि इतरांना क्वारंटाइन करण्यास दिरंगाई होत आहे.कोविड रुग्णालय भरल्याने रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना वेटिंगवर ठेवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांना विचारले असता माहिती घेऊन सांगतो, असे ते म्हणाले. मात्र, त्यानंतर त्यांच्याशी संपर्कझाला नाही. सरकारी प्रसूतिगृह, विमा रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, आयटीआय कॉलेजचे रु पांतर कोविड रु ग्णालयात केले. तर, रेडक्र ॉस रु ग्णालय संशयित रुग्णांसाठी आरक्षित आहे. मात्र, या सर्व रुग्णालयांची क्षमता केव्हाच संपलेली आहे. दरम्यान, मनपाने तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत रुग्णालय उभारण्याचे काम सुरू केले. तसेच डॉ. आंबेडकर अभ्यासिकेशेजारील शाळेतही रुग्ण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तेथील कामे पूर्ण झालेली नाहीत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे