शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

coronavirus : कोरोना व्हायरसचे आर्थिक संकट २००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 3:56 PM

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला .

ठाणे - सध्या जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसने सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात आणले आहे.  सर्वत्र लॉग डाऊनची परिस्थिती असतानाच १ नोव्हें.२००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे वास्तत ठाणे जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटनेचे अध्यक्ष विनोद लुटे यांनी स्पष्ट केले. ते म्हणतात की,  कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला .गेल्या काही दिवसापासून शेअर बाजार सतत गडगडत असून गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे   आर्थिक नुकसान होत आहे. २००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या अंशदायी पेन्शन योजना(डिसीपीएस)/ नॅशनल पेंशन स्कीम (एनपीएस) शेअरबाजाराशी संबंधित आहे. त्याचा आर्थिक फटका या २००५ नंतरच्या शासकीय  कर्मचाऱ्यांनाही बसत आहे.१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन योजना न लावता डीसीपीएस/ एनपीएस ही नवी अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे.या योजनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १० टक्के रक्कम तर शासनाकडून १४ टक्के रक्कम कपात करून त्या कर्मचाऱ्यांच्या एनपीएस/डिसीपीएस खात्यामध्ये जमा केली जाते. जमा रकमेपैकी ३३.२४ टक्के एसबीआय पेन्शन फंड स्कीम मध्ये,३३.२४ टक्के रक्कम यूटीआय रिटायरमेंट सोल्यूशन पेंशन फंड स्कीम मध्ये तर उर्वरित३३.५२ रक्कम एलआयसी पेन्शन फंड स्कीममध्ये राज्य सरकारकडून गुंतवली जात असल्याचे लुटे यांच्या कडून सांगितले जात आहे.  कर्मचाऱ्यांची ही  रक्कम शेअर बाजाराशी संबंधित असल्याने यात सतत चढउतार पाहायला मिळत असतो. परंतु सध्याच्या कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून त्याचा गंभीर परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले पंधरा दिवस शेअर बाजारात सतत घसरण होत असून सोमवारी (ता.२३) रोजी  सेन्सेक्स तब्बल १० टक्क्याने घसरून २९९१ अंकाने खाली घसरला याचा आर्थिक फटका २००५ नंतर च्या वर्ग तीन च्या कर्मचाऱ्यांना ३५ते४० हजार, वर्ग एकदोनच्या अधिकाऱ्यांचे किमान ६० हजार ते १ लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज जुनी पेंशन हक्क संघटनेचे ठाणे जिल्हाअध्यक्ष विनोद लुटे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.कर्मचाऱ्यांचा वृद्धापकाळाचा आधार असलेल्या पेंशनची रक्कम शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासंदर्भात पुनर्विचार करण्याची भावना कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या अनुसरुन   "सरकारने कर्मचाऱ्यांचा पैसा बेभरवशाच्या शेअर बाजारात न गुंतवता वृद्धापकाळात आधार म्हणून १९८२ ची पेंशन योजना लागू करावी, अशी मागणी ही लुटे यांच्या कडून केली जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEmployeeकर्मचारीGovernmentसरकार