शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

Coronavirus: कोरोनाच्या भयाने मोटार खरेदी वाढली; सार्वजनिक वाहतूक टाळण्याकडे कल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 1:40 AM

दुचाकी, ट्रॅक्टरचीही मागणी वधारली, कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन केला होता.

जितेंद्र कालेकरठाणे : कोरोनाच्या प्रकोपामुळे गेली अनेक दिवस थंडावलेला दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा तसेच ग्रामीण भागातील ट्रॅक्टरचा व्यवसाय आता पुन्हा नव्याने उभारी घेऊ लागला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास केल्यास कोरोनाचा संसर्ग होईल या भीतीमुळे संपूर्ण ठाणे जिल्हयात मोटारकारच्या खरेदीमध्ये तर चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर २०१९ मध्ये ८५९ कारची खरेदी झाली होती. सप्टेंबर २०२० मध्ये एक हजार १६२ इतक्या मोटारींची विक्री झाली आहे. मोटारसायकल आणि ट्रॅक्टर खरेदीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत वाढ झालेली नसली तरी गेल्या सहा महिन्यांतील ग्राहकांचा निरुत्साह पाहता सप्टेंबर महिन्यात ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळत आहे.

कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन केला होता. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यामुळे दुचाकी, चार चाकी त्याचबरोबर ग्रामीण भागात ट्रॅक्टर खरेदीसाठी ग्राहकांनी सुरुवात केली आहे. एरव्ही, आवडीच्या रंगासाठी किंवा आवडीच्याच ब्रॅन्डसाठी थांबणारे ग्राहक आता शोरुममध्ये उपलब्ध असलेल्या वाहनांना पसंती देत आहेत. ठाणे जिल्ह्यात सप्टेंबर २०१९ मध्ये सहा हजार १३५ ग्राहकांनी दुचाकींची खरेदी केली होती. यंदा सप्टेंबर २०२० मध्ये हा आकडा कमी होऊन तो चार हजार ८२० झाला आहे. मात्र त्यापूर्वीच्या महिन्यांमधील दुचाकीच्या खरेदीतील घसरण पाहता हा चांगला प्रतिसाद असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर शेतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टर खरेदीतही ग्राहकांनी उत्साह दाखविला आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये २५ ट्रॅक्टरची खरेदी झाली. सप्टेबर २०२० मध्ये हा आकडा १६ वर गेला.प्रत्येक वाहन खरेदीसाठी वेगळ््या ब्रॅन्डची मागणी असते. एका ठराविक दुचाकीसाठी एकेकाळी चार महिन्यांचे वेटींग होते. आता कलर आणि तशाच प्रकारच्या दुचाकी उपलब्ध होत असल्यामुळे वेटींगचे प्रमाण फारसे नाही. मागणीच्या तुलनेत उत्पादन कसे आहे. त्यावर हा वेटींगचा काळ अवलंबून आहे. - जयंत पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारीदुचाकीची मागणी चांगली आहे. कोरोनामुळे अपेक्षित दुचाकींची पूर्तता होत नाही. १०० दुचाकींची मागणी केल्यानंतर ५० वाहने उपलब्ध होत आहेत. - राजशंकर नायर, व्यवस्थापक, रणजीत मोटर्स, ठाणेलॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सध्या ग्राहकांना हवे असलेले ट्रॅक्टर उपलब्ध होत नाही. ट्रॅक्टर खरेदीसाठी प्रतिसाद चांगला आहे. त्यामुळे विक्रीमध्येही वाढ झाली आहे. - विजय जोशी, ट्रॅक्टर विक्रेते, मुंबईचार चाकी वाहनांची व मुख्यत्वे मोटारींची विक्री वाढलेली आहे. प्रत्येकाला कोरोनाच्या भीतीमुळे सार्वजनिक वाहनांमधून प्रवास टाळावा, असे वाटू लागले आहे. त्यामुळे छोटी का होईना मोटार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे - संभाजी चव्हाण, मोटार विक्रेते, ठाणेगेल्या चार वर्षांत माझ्याकडे रक्कम जमा झाली होती. गेल्या पाच महिन्यांतील कोरोनाचा काळ पाहिल्यावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवास टाळण्याकरिता स्वत:ची मोटार खरेदी करणे ही गरज वाटली. - प्रथमेश कदम, कळवा, ठाणे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtwo wheelerटू व्हीलर