CoronaVirus: साडे आठशे कुटुंबांना धान्य वाटप करून त्यांनी साजरा केला वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 16:41 IST2020-04-17T16:38:31+5:302020-04-17T16:41:12+5:30
पालघर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांचं स्तुत्य पाऊल

CoronaVirus: साडे आठशे कुटुंबांना धान्य वाटप करून त्यांनी साजरा केला वाढदिवस
- हुसेन मेमन
जव्हार: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका आदिवासी व गरीब बांधवांना बसत आहे. त्यामुळेच पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम राबवून जव्हारच्या ८५० कुटुंबियांना धान्य वाटप केले.
जगभर कोरोना महामारीचे संकट फैलावत असताना लॉकडाऊन काळात हातावर काम असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. जव्हार शहरातील ८५० कुटुंबांना जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक तथा जिल्हा परिषद पालघरचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी वाढदिवसानिमित्त धान्य वाटप केले. त्यात गोडतेल, डाळ, हरभरा, चवळी, मिरची पावडर, हळद, कांदे-बटाटे, मीठ या दैनंदिन वापरातील वस्तूंचा समावेश आहे. शहरातील सनसेट पाँईट, महादेव आळी, नवापाडा, आडखडक रोड या परिसरात हे धान्य विरोधी पक्ष नेते दीपक कांगने, ओमकार कुवरे, तुषार लांडे यांच्या मार्फत वाटप करण्यात आले आहे.